बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

सोयगाव शिवारात वीज कोसळून दोघे गंभीर ,सोयगाव तालुक्यातील घटना

सोयगाव,दि.२४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
अचानक दाटून आलेल्या ढगाळ वातावरणात विजांच्या कडकडाटात सुरु झालेल्या दहा मिनिटाच्या पावसात अंगावर वीज कोसळून दोघे गंभीर झाल्याची घटना सोयगाव आणि जामनेर तालुक्याच्या महसुली सीमारेषेवर बुधवारी दुपारच्या सुमारास घडली,मात्र कोसळलेली वीज चमत्कारिकरित्या कोसळली आहे.अर्धी वीज जळगाव आणि अर्धी औरंगाबाद अशा दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर कोसळली.या घटनेत पळसखेडा(ता.सोयगाव)येथील दोघे गंभीर जखमी झाले आहे.
पळसखेडा ता.सोयगाववरून मोटारसायकलने कुटुंबातील तिघे जात असतांना अचानक विजांचा कडकडात आणि पावसाचा जोर वाढल्याने सोयगाव-पळसखेडा रस्त्यालगत एका शेतातील निंबाच्या झाडाखाली आश्रयाला थांबले असता अचानक झाडावर वीज कोसळून झाडाखाली असलेल्या दिलावर रुबाब तडवी(वय १०)आणि हसीना रुबाब तडवी(वय ३५)हे दोघे माय-लेक विजेच्या झटक्याने गंभीर जखमी झाले होते,दरम्यान घटनास्थळ हे जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवर असल्याने दोन्ही जिल्ह्यांचे महसूल विभाग संभ्रमात पडले असतांना सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा होऊ शकलेला नव्हता,परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने या दोघांना गम्भीरावस्थेत सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.केतन काळे,साईनाथ जाधव,सुनील वानखेडे यांच्या पथकाने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला रवाना केले आहे.

सोयगाव परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार होवून झालेल्या दहा मिनिटाच्या पावसात विजांचा कडकडात होवून वीज कोसळली,परंतु उभ्या असलेल्या ठिकाण हे जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमारेषेवर असल्याने वीजही चमत्कारिकरित्या कोसळून अर्धी वीज जळगाव आणि अर्धी औरंगाबादच्या शिवारात कोसळली होती त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या महसुली विभागातील दोन शेतातील पिके विजेच्या धक्क्याने करपली असल्याची माहिती हाती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *