जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी भाविकांना लागेल त्या गावातून बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख हिरालाल ढाकरे यांनी सोमवारी दोन बसेस पांढरपूर यात्रेसाठी रवाना करतांना दिली.दरम्यान सोयगाव आगारातून सोमवारी भाविकांसाठी दोन बसेस सोडण्यात आल्या
सोयगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून आषाढी यात्रेसाठी भाविकांना परिवहनच्या बसेसची मागणी झाल्यास तातडीने मागणी करण्यात आलेल्या गावातून बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल,त्यासाठी मागणी झालेल्या गावातून पंधरा प्रवाशी असणे अनिवार्य आहे.सोयगाव आगारातून भाविकांना लागेल त्या ठिकाणावरून आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी सोयगाव आगाराने विशेष भेट दिली आहे.
पंढरपूर यात्रेसाठी नियमित सात बसेस-
दरम्यान आषाढी यात्रेसाठी पंढरपूर यात्रेसाठी सोयगाव आगारातून नियमित सात बसेस सोडण्यात येणार असून त्यापैकी दोन बसेस सोमवारी रवाना झालाय आहे.उर्वरित पाच बसेस बुधवार पासून पंढरपूर यात्रेसाठी मार्गस्थ होणार आहे.परंतु याव्यतिरिक्त मागणी करण्यात आलेली गावातून पंधरा प्रवाशी असल्यास तातडीने त्या गावातून बससेवा उपलब्ध करून देण्याचा नवीन उपक्रम सोयगाव आगाराने राबविला आहे.