पाटोदा:आठवडा विशेष टीम― आज दि.२८ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय वाघिरा व सर्व ग्रामस्थ, वाघिरा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.या कार्यक्रमाला गावातील सर्व गावकरी मंडळींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.सदरील शिबिरामध्ये ११० महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयराम बांगर यांनी भूषविले त्यांनी अध्यक्षीय भाषणात ग्रामपंचायत वाघिरा यांच्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देऊन गौरव केला.त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.डॉ.तांदळे (तालुका आरोग्य अधिकारी पाटोदा) व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.तांदळे यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी ग्रामपंचायत असा गौरव मौजे वाघिरा ग्रामपंचायतचा केला.
या कार्यक्रमाला राम बांगर,ज्ञानोबा जगदाळे,श्री.मिठू साहेबराव बांगर,बाबासाहेब शामराव बांगर,राजाभाऊ कदम,बाबासाहेब साहेबराव बांगर,सौ.यमुनाबाई बांगर,नरहरी आरगुडे,भाऊसाहेब बांगर,सतीश वाघमारे,गणेश बावणे,सौ.मीरा आघाव (आशाताई),सौ.नंदा बडगे,सौ.शेख,हौसराव शिंदे,डॉ रमेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सुरेश उद्धव बांगर व श्रीकृष्ण बांगर यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामसेवक बुरांडे के.के. यांनी केले.