सोयगाव,ता.२७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या आझाद मैदानावरील शिक्षकांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी मंगळवारी सोयगाव तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला.
सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांनी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करून विद्यार्थ्यांना काळ्याफिती लावून ज्ञानार्जन करून निषेध तीव्र केला.पोलिसांच्या या अमानुष कृत्याचा तालुकाभर शिक्षकांनी निषेध व्यक्त केला.