औरंगाबाद जिल्हाक्राईमसोयगाव तालुका

सोयगाव:माळेगाव(पिंपरी) सोयगावला माय लेकींवर चाकूहल्ला ,दोघे गंभीर जळगावला हलविले

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
रस्त्याने पायी जाणाऱ्या माय-लेकीवर अज्ञाताने चाकूहल्ला करून दोघींना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी माळेगाव पिंपरी ता.सोयगाव या गावात घडली.दरम्यान माय लेक रस्त्याने पायी जात असतांना अचानक मागून तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमाने हल्ला केल्याने सोयगाव तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे.दोघींना गंभीर अवस्थेत जळगावला तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
माळेगाव(पिंपरी)ता.सोयगाव या गावातील सविताबाई मंगलदास अहिरे(वय ३५)आणि मुलगी आकांक्षा मंगलदास अहिरे(वय ९)या गावाच्या जवळून पायी जात असतांना,अज्ञात इसमाने मागून येत सविता अहिरे हिला उचलून घेवून अपहरण करण्याच्या नादात त्याचा प्रयत्न हुकल्याने त्याने तिच्यावर चाकूने हल्ला चढवून मुलगी आकांक्षा हि आडवी झाली असता,तिच्यावरही चाकूने सपासप वार करून अज्ञाताने घटनास्थळावरून पलायन केले.दरम्यान सविता अहिरे हिच्या पोटात व हातावर चाकूचे सपासप वार करून अज्ञात इसम फरारी झालेला आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अज्ञाताचा पाठलाग केला असता,चाकूचा वार करणारा पाचोरा जि,जळगावच्या दिशेने अंधाराचा फायदा घेवून फरारी झाला आहे.या घटनेत महिला सविता अहिरे व तिची मुलगी आकांक्षा अहिरे गंभीर जखमी झाल्या असून सोयगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांचेवर प्राथमिक उपचार करून तातडीने उपचारासाठी दोघांना जळगावला हलविण्यात आले आहे.पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे,सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्यासह पथकाने माळेगाव पिंपरी ता.सोयगाव गावात धाव घेत पंचनामा केला आहे.

माळेगाव पिंपरी परिसरात नाकाबंदी-

दरम्यान सोयगाव पोलिसांच्या पथकाने माळेगाव पिंपरी गावाच्या चारही बाजूंनी नाकाबंदी केली असून पाचोरा जि.जळगावकडे पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांनी दिली.

चोरीचा अंदाज नाही-

दरम्यान पायी जाणाऱ्या महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेण्याच्या प्रयत्नात हा हल्ला झाला असावा अशा चर्चेला रात्री रंग चढू लागल्याने हा चोरीचा प्रयत्न नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तुला नव्हते मारायचे आरोपीचे जखमी महिलेशी वक्तव्य-

अज्ञात इसमाने सदरील महिलेच्या पोटात चाकूचे सपासप वार केल्यानंतर तू होतीस का तुला नव्हते मारायचे असे उद्गार काढल्याचे जखमी महिलेने पोलिसांना जबाबात सांगितले आहे.त्यामुळे अज्ञात इसमाचा अंदाज दुसरा असतांना तिसरीलाच जखमी केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button