आष्टी तालुकाबीड जिल्हाबीड तालुका

आष्टी: धानोरा येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

आष्टी:आठवडा विशेष टीम―तालुक्यातील धानोरा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे कोणीच या मृतदेहाजवळ जायला तयार नाही घटनेची माहिती ग्रामस्थांनी आष्टी पोलीसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्यांनी आरोग्य विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर आरोग्य पथकाचे कर्मचारी पीपीई कीट परिधान करून आले. सर्वप्रथम त्यांनी मतदेहावर सॅनीटायझरची फवारणी केली. मृतदेहाच्या खिशात काही कागदपत्रं मिळतात का ते तपासले जात आहे. मात्र अद्याप त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. ग्रामस्थांच्या माहितीनुसार एक अनोळखी व्यक्ती चार ते पाच दिवसापासन तिथेच पत्र्याच्या शेडजवळ थांबत होता. मात्र त्याच्याकडे कोणी विचारायला गेले नव्हते. त्यामुळे तो कधी मृत . त्यामुळे तोकधीणी झाला? कशाने मृत झाला? तो कोण होता? याची कुणाला कल्पना नाही. मात्र आज सकाळी दगंधी पसरल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता हा मृतदेह आढळून आला.

नेकनुर येथेही महिलेचे प्रेत सापडले

बीड:तालुक्यातील नेकनुर येथील नागीबाचा मळा परिसरात एका महिलेचे प्रेत आज दुपारी आढळुन आले. मृतदेहा शेजारी एक पिशवी आढळुन आली असुन त्यामध्ये असलेल्या ओळखपत्रावर सुभद्राबाई नानाजी डिसले असे नाव असुन पत्ता वैतागवाडी असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button