सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―तांत्रिक अडचणीमुळे दहा दिवसापासून सेवा खंडित असलेल्या बी.एस.एन.एल च्या मनोऱ्याची सेवा सुरळीत न झाल्याने ओनलाईन अर्ज करतांना झालेले शैक्षणिक नुकसान आणि बंद असलेल्या सेवेचा कंटाळा आल्याने तरुणाने चक्क मनोऱ्याजवळ मुंडण आंदोलन केले.गावातील काही तरुणांनी या तरुणाची समजूत घातली.
जरंडी,निंबायती या दोन गावातील बी.एस.एन.एल चे दोन्ही मनोरे दहा दिवसापासून बंद आहे,सेवा मिळत नसल्याने स्पर्धान्हे अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने चक्क प्रवीण देवरे या विद्यार्थ्यांने मनोऱ्या जवळ मुंडण आंदोलन करून बी.एस.एन.एल चे श्राद्ध घातले,दरम्यान गावातील जीवन तायडे,योगेश चौधरी,अरुण हिवाळे,सचिन आंबेकर,शिवा चौधरी,विजय चौधरी,कैलास माताडे,वैभव लव्हाळे आदी रातुनांनी या तरुणाची समजूत घालून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सेवा सुरळीत करण्या विषयी चर्चा केली असता,आमच्या विभागाकडे वाहनेच उपलब्ध नसल्याने त्या ठिकाणी आम्हाला यायला अडचणी निर्माण होत आहे,नवीन वाहने उपलब्ध झाल्यावर आम्ही दुरुस्तीसाठी जरंडी ला येऊ असे खोचक उत्तर दिल्याने रोष वाढला होता.दरम्यान जरंडी,निंबायती ता सोयगाव येथील दोन्हीही मनोरे सेवेपासून दूर झालिया सून दहा दिवसापासून या परिसरातील १० गावातील ग्राहक त्रास सहन करत आहे.
0