ब्रेकिंग न्युज

सोयगाव: शहराला छावणीचे स्वरूप,तालुक्यात शांततेत निर्णयाचे स्वागत

सोयगाव दि.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
रामजन्मभूमी आणि बाबरीमशीद जागेचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला.या निकालाचे तालुक्यात शांततेत सर्वत्र स्वागत करण्यात आले असून तालुक्याच्या काही भागात फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात या निर्णयाचा स्वागत करण्यात आले.दरम्यान हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्मियांनी या निर्णयाचा आदर केला त्यामुळे सोयगाव तालुक्यात सध्या शांतता आहे.
रामजन्मभूमी-बाबरीमशीद जागेचा निकाल शनिवारी पूर्ण होताच शांततेत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.यावेळी सोयगाव पोलिसांनी शहरासह तालुक्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवल्याने शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.ग्रामीण भागातही पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे,सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांचेसह पोलीस पथकांनी गस्त घालून नजर ठेवली होती.दरम्यान गृहरक्षक दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी ग्रामीण भागात तैनात करण्यात आले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button