सोयगाव,ता.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला परंपरागत असलेल्या बैलांच्या खांदेमळणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत घोसला परिसरात सुरू होती.दिवसभर कोसळलेल्या श्रावण सरी आणि त्यातच खांदेमळणीचा उत्साह यामुळे रात्री उशिरापर्यंत बैलांची पारंपरिक खांदेमळणी सुरू होती.
मंगळवारी पोळा सण रद्दची घोषणा तालुका प्रशासनाकडून सायंकाळी उशिरा करण्यात आली आहे त्यामुळे आता पोळा सणाचा उत्साह घरोघरीं पहावयास मिळणार आहे कोरोना संसर्गाच्या सावट मुळे यंदाचा ग्रामीण भागाचा पोळा घरीच साजरा होईल त्यासाठीची खा देमळणी सोमवारी सायंकाळी कऱण्यात आली यामध्ये बैलांच्या खांद्याला तूप लावून चोळण्यात येऊन पूजा करण्यात येते व रात्रभर दिवा लावण्याची परंपरा आहे.
0