वाशी:आठवडा विशेष टीम― परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे .शेतात काडून रचून ठेवलेल्या पिकानाच नव्हे तर उभ्या पिकांना देखील पीक फुटायला लागले आहे. या पीक नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ऐन दिवाळीच्या सणात गावागावात जाऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी सह्यांची मोहीम राबवण्यात आली होती. वाशी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सह्यासहित आज वाशी तहसील येथे आज निवेदन सादर केले.
यावेळी उपस्थित शेकाप चे भाई विनायक शेटे, पारगाव चे धनंजय मोटे स्वाभिमानी चे प्रसाद सातपुते लाखणगाव चे उल्हास लाख हातोला येथील बाळासाहेब खवले,मुरली खवले,बबन फुलावरे,नितीन यादव,लहू भोजने,चंद्रकांत खवले,अमोल खवले वाशी वीजोरा येथील शेतकरी पारगाव येथील शुभम तातुदे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, आकाश शिंदे,योगेश चाटे,संभाजी चव्हाण,सह इतर तरुण उपस्थित होते.