सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र शासनाने रझाकारी पद्धतीने कृषिपंपाची विजतोडणी करून कोरोना कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ व तात्काळ विजजोडणी करण्यात यावी तसेच मांजरसुंभा महसुल मंडळातील २३ गावे खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्या गावातील शेतक-यांना अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय मांजरसुंभा येथील राधिका हाॅटेल समोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, , प्रदेशउपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे,भाजपा तालुकाध्यक्ष बीड स्वप्निल गलधर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा बीड बाळासाहेब मोरे,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सौ. वैशालीताई चौरे,उपसरपंच कोळवाडी तुळशीदास महाराज शिंदे, युवा नेते मसु जाधव, सरपंच पालसिंगन विक्रम खंडागळे,सरपंच हिंगणी अंकुश गोरे,उपसरपंच चाकरवाडी, हनुमान चाळक, चेअरमन सेवा सोसायटी सात्रा पोपटराव हावळे, सरपंच बोरखेड बाळासाहेब गावडे, अशोक घोडके, दत्ता जगदाळे, माजी सरपंच शहाजी आण्णा घोडके, बाळासाहेब ढास,नाना चव्हाण, काशिनाथ मांडवे,संभाजी कदम, महादेव नाईकवाडे,विष्णु सुरवसे महाराज, आजिनाथ घरत, दादासाहेब वाघमारे,राहुल खोसे,कल्याण कागदे, आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष बीड माजी सैनिक अशोक येडे, भाजपा युवा नेते अशोकदादा रसाळ,शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक, ऑल इंडीया पॅथर मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव शेख युनुस च-हाटकर, वंचित नेते संदिप जाधव,आदिंनी आवाहन केले आहे.

जिल्हाप्रशासनाने शब्द न पाळल्यामुळे चक्काजाम आंदोलन
____
३० नोव्हेंबर रोजी बिंदुसरा तलावातील जलसमाधी आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता निकम, व उपअभियंता ग्रामिण गुंजाळ यांनी फोनवरून अधिक्षक अभियंता महावितरण कोलप यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन प्रति रोहीत्र २५,००० रू भरून विजजोडणी करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु महावितरणच्या आधिका-यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे दि.६ डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते परंतु ६ डिसेंबर रोजी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन व” हाय अलर्ट “मुळे पोलीस प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढु नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या भुमिकेतुन तूर्तास स्थगित करून दि.९ डिसेंबर गुरूवार रोजी सकाळी ११:३० वाजता मांजरसुंभा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून महावितरण व महसुल प्रशासनातील आधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतरच चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात येईल असे निवेदन महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या, अन्यथा कोयता चालणार नाही ―पंकजाताई मुंडे यांची साखर संघाच्या बैठकीत आग्रही मागणी

विमा कवच, कोरोना सुरक्षा यावरही केल्या सूचना

मुंबई दि.२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज साखर कारखाना संघाच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली. मजूरांना वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली.

संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे या संपात विनाकारण हस्तक्षेप करणाऱ्यांसाठी
पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या असल्याचे समजते. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


गोपिनाथ मुंडेंची कन्या प्रितमताई मुंडे यांची महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष पदी निवड

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची कन्या बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेणाऱ्या स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्येवर ही प्रमुख जबाबदारी दिल्यामुळे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.सोशल मीडिया सह इतर माध्यमांवर फक्त डॉ प्रितम मुंडे यांचेच नाव चर्चेत आले आहे.

नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४० हजारांहून अधिक कुटुंबांना घरपोच दिले किराणा किट ,अन्न-धान्यासह भाजीपालाही केला मोफत वाटप

धनंजय मुंडेंचा परळी मतदारसंघात नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अखंड मदतयज्ञ

परळी:आठवडा विशेष टीम― राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघात गोरगरीब – गरजू नागरिकांना त्यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यापासून मदतीचा यज्ञ सुरू केला असून, आतापर्यंत ४० हजारांहून अधिक कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप केले आहेत.

या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर, हळद, तिखट, मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

या कठीण काळात अनेक लहान मोठे उद्योग – व्यवसाय ठप्प असून हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये या उद्देशाने मोठे मदतकार्य उभारले आहे. ४० हजार किराणा किट सह जवळपास १० लाख रुपयांचा भाजीपाला शेतकऱ्यांकडून विकत घेत नागरिकांना मोफत वाटप करून मुंडेंनी दुहेरी दिलासा दिला आहे. तसेच रेशनकार्ड नसलेल्या अनेक नागरिकांना गहू, तांदूळ आदी धान्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जात आहे.

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटापर्यंत परळी शहरातील प्रभाग १ मध्ये १००० किट, प्रभाग २ मध्ये १५०० किट व १५ क्विंटल तांदूळ, ३ मध्ये १५०० किट, ४ मध्ये १५०० किट, ५ मध्ये १३०० किट, ६ मध्ये १००० किट, ७ मध्ये १७०० किट, ८ मध्ये १७०० किट, ९ मध्ये १५०० किट, १० मध्ये १००० किट, ११ मध्ये ८०० किट, १२ मध्ये, १००० किट, १३ मध्ये १००० किट, १४ मध्ये १००० किट, १५ मध्ये १००० किट आणि प्रभाग १६ मध्ये १५०० किट वाटप केल्या आहेत.

ग्रामीण भागातील सिरसाळ्यात २००० किट वाटप केल्या आहेत तर नागापूर ५००, टोकवाडी १०००, कण्हेरवाडी ११००, घाटनांदूर १००० किट व १५ क्विंटल गहू, पिंपळा ५०० किट, धारावती तांडा व ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ६०० किट, जिरेवाडी ६००, सायगाव २५०, सातेफळ २५०, सुगाव १२५, तडोळा ७५, अंबासाखर ७५, वाघळा १२५, मूडेगाव ७५, वाघबेट ३७०, पिंपरी ३००, गाडेपिंपळगाव ५००, नंदागौळ ९२५, नांदगाव १२५, नांदगाव तांडा १२५, भारज १२५, सेलूअंबा १२५, राडी ३५०, गिरवली २००, पोखरी १२५, अकोला १२५, लिंबगाव १२५, लिंबगाव तांडा १२५, राडी तांडा १२५, वाघळा राडी ५०, धानोरा बुद्रुक १२५, जवळगाव १००० बरदापुर ५००, तर पट्टीवडगाव येथे ४०० कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले आहे.

नाथ प्रतिष्ठानने देणगी स्वरूपात मिळालेला १३० क्विंटल गहू, १०० क्विंटल तांदूळ मोफत वाटप केले असून परळी येथील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सुरू असलेल्या अन्नछत्रसाठी २१ दिवस पुरेल या हिशोबाने २१ क्विंटल गहू, १७ क्विंटल तांदूळ, ३.५ क्विंटल तूरडाळ आणि २१ तेलाचे डबे मोफत दिले आहेत.

त्याचबरोबर दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या ब्रदर्स, सफाई कामगार आदी ५०० व्यक्तींना, नगर परिषदेच्या ५०० स्वछता कर्मचाऱ्यांना, ४०० विट भट्टी मजुरांना, हातगाडी – रिक्षा चालवणाऱ्या २०० व्यक्तींना, हमाल ३००, केशकर्तन व्यवसायतील १०० तसेच वृत्तपत्र वितरण करणाऱ्या १०० हून अधिक व्यक्तींना या किराणा किट मोफत दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार मतदारसंघातील शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत पोचून घरपोच मदत देण्यासाठी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांच्यासह नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी चोख नियोजनासह अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत ४० हजारांहून अधिक कुटुंबापर्यंत हे किराणा किट पोचवले असून अजूनही हे मदतकार्य सुरूच राहणार आहे.

मोठ्या शहरांसह जिथे आहेत तिथे मदत…

मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, लातूर अशा अनेक ठिकाणी काम करून पोट भरायला गेलेल्या लोकांच्या मदतीलाही धनंजय मुंडे धावून गेले आहेत. धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध ठिकाणी अडकलेल्या कुटुंबांना सुद्धा किराणा किट घरपोच मिळवून दिले असून या संकट काळात त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेबद्दल दाखवलेल्या या आपुलकी व दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा कीट वाटणार की ग्रामपंचायतची भरती करणार ? ऊसतोड मजुरांचा सवाल ! – डॉ ढवळे

पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची संघटीत गुन्हेगारी मोडीत काढा

जिल्हाधिकारी यांचा वचक राहीला नाही, १४ दिवस झाले सरपंच, ग्रामसेवक फिरकलेच नाहीत ―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश दि.०७:आठवडा विशेष टीमबीड तालुक्यातील मौजे बेलगांव येथिल साखर कारखान्यावरून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करुन देणे सोडाच आज दि.७/०५/२०२० रोजी वार गुरुवार दुपारी १२ वाजेपर्यंत कुणीही भेटायला आले नाहीत, आठवड्यापूर्वी पालकमंत्री मुंडे यांनी घोषणा केलेले मोफत कीराणा कीट ८ दिवस झाले तरी आमच्यापर्यंत पोहोचले नाही ,होम क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर मोफत किराणा किट वाटणार आहात कि ग्रांमपंचायतची भरती करणार असा संतप्त सवाल ऊसतोड मजुरांनी केला आहे.

विशाल काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

मो.नं.९३५९२१११८६

आम्ही जवाहर कारखान्यावरुन येऊन १४ दिवस झाले, सरपंच, ग्रामसेवक भेटलेच नाहीत, ग्रां.पं.शिपाई बापु थोरात यांनी सांगितले सरपंचांनी गावठाणा बाहेर रहायचे सांगितले आहे. आज १४ दिवस झाले आम्हाला सरपंच, ग्रामसेवक भेटायला आलेच नाहीत. तलाठी दोन वेळेस आले पण इथं लाईट, पिण्याचे पाणी काहीच सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही म्हणाले तुमचं तुम्ही बघा.

सविता काळे , होम क्वारंटाईन ऊसतोड मजूर

आम्हाला पिण्याच्या पाण्याची, लाईटची कसलीही सोय केली नाही, १४ दिवस झाले २ कीलोमीटर डोंगरातुन तलावाखालच्या झ-यातुन पाणी आणावे लागते ,ऊन्हातान्हात लहान लेकरांचे हाल होत आहेत, १४ दिवसात धान्य दिले नाही, लाईटची सोय नसल्याने विंचू काट्याची भिती वाटते. पालकमंत्री मुंडे साहेबांनी मोफत किराणा किट देऊ म्हणलेले आठवड उलटुन गेला.अजुन काहीच दिले नाही. आम्हाला आमच्या गावातील घरी जाण्याची परवानगी द्यावी.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश

पालकमंत्री मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांना मोफत किराणा किट देण्याची घोषणा होऊन आज ८ दिवस झाले, दि.५ तारखेला अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना लेखी आदेश ५ तारखेला दिले आहेत. परंतु सरपंच, ग्रामसेवक, आणि तलाठी हे त्यांच्या संघटनेच्या जोरावर संघटीत गुन्हेगारी करत आहेत ती पालकमंत्र्यांनी मोडीत काढावी.
दि. २३/०४/२०२० रोजी जिल्हाधिकारी बीड तथा अध्यक्ष राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण यांनी ग्रामसेवक, तलाठी यांनी मुख्यालयी रहावे अन्यथा राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचा कनिष्ठ स्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांना धाक राहीला नाही त्यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केली जाते.त्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.आणि २ दिवसांच्या आत मोफत किराणा किट वाटप करण्यात यावे. याप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य , कार्यकारीणी आधिकारी , जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अन्नपुरवठा व पुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.


पालकमंत्री धनंजय मुंडे ,मोफत किराणा किट तर राहुद्या अधिकाऱ्यांना नुसतं भेटायला तरी सांगा, घारगाव ऊसतोड मजुरांची कैफीयत– डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―दि. २९ एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांनी ऊसतोड कामगारांना जिल्हा परिषद कडुन मोफत किराणा किट मिळण्याची घोषणा करत १ कोटी ४३ लाख रू निधि ग्रामविकास विभागाने विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यता दिली आहे.परंतु वास्तविक आज दि.४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सूद्धा ऊसतोड मजुरांना मोफत किट दुरच साधं सरपंच, ग्रामसेवक, तलाठी भेटायला सुद्धा आले नसल्याचे घारगांव येथिल ऊसतोड मजुरांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना व्यथा बोलून दाखवली.

मीना सुभाष माळी , ऊसतोड मजूर

आम्हा ऊसतोड मजुरांची दखल कोणी घेत नाही, गावाच्या बाहेर रहा एवढंच म्हणतात. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी कूणीही भेटायला आले नाहीत. पालकमंत्री मुंडे साहेबांनी ऊसतोड मजुरांना मोफत किराणा सामान देण्याची घोषणा करूनही ६ दिवस उलटले परंतु आम्हाला फुकटात सामान सोडुनच दर्या भेटायला सुद्धा कुणी आलं नाही.

सुशिला हरिदास गव्हाणे , ऊसतोड मजूर

आमचे लेकरं बिस्कीट पुड्यासाठी तरसलेत,रडतेय , आमच्या पैशाने सूद्धा कोणी आणुन द्यायला नाही.आम्ही सगळेच ऊसतोडण्यासाठी साखर कारखान्यावर जातोय. आमचं गणगोत इथं नाही,आम्ही काय खायचं,उपाशी मरायचं का ???

आरती बाबु माळी ,ऊसतोड मजूर

आमची पिण्याच्या पाण्याची सोय नाही,हे वालवाटे निघणारे पाणी प्यायला , सांडपाणी , तर जनावरांना पिण्यासाठी वापरावे लागते. साधी टंकरची सुद्धा सुविधा नाही, या घाण पाण्यामुळे माणसाबरोबर जनावरं सुद्धा बिमार होत्याल.त्यात या कोरोना महामारी मुळं पिण्याचे पाणी शूद्ध द्यायला पाहिजे.पण आमच्याकडं कुणीच लक्ष देत नाही…तुम्हीच काहीतरी बघा , कलेक्टर साहेबांना बोला आमची अडचण सांगा…

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:

या ऊसतोड मजुरांची हेळसांड करणारे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड ,मा.राहुलजी रेखावार साहेब, जिल्हाधिकारी बीड,. यांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी. मा.राहुलजी रेखावार , जिल्हाधिकारी बीड आणि मा. अजितजी कुंभार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड , मा.राधाकीसन पवार साहेब , जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री , कृषिमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार ई-मेल व्दारे केली आहे.


#CoronaVirus धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन

जिल्ह्याला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन – तीन ची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना

आढावा बैठकीत होमगार्ड उपलब्धी व वेतन यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांना पीपीइ किट, जिल्ह्यात आवश्यक सोयाबीन बियाणे आदी विषय लावले मार्गी

बीड (दि.०४):आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न ना. मुंडेनी गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या ५% निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.

यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीन चे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धी संदर्भातही चर्चा झाली. ना. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे ४ ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लोक डाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले; यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, यांच्यासह सर्व विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत. लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यासाठी 9000 पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत व्हेंटिलेटर खरेदीेतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी असे सांगितले.

याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर बीड तालुक्यात सुरू करण्यात येत असून, सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे. यावर डिझेल वितरणाची मिटर, किंमत दर्शवणारीे यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे बीड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न त्यांच्या बांधावर सुटेल अशी आशा आहे.

बीड मधील इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता 550 होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे.

बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली जात असून याचा उपयोग तात्पुरत्या कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींना व्हावा पण नोकरी व काम धंदा निमित्य इतर जिल्हा व शहरात राहणाऱ्यांनी बीड जिल्ह्यात येण्यासाठी याचा वापर करू नये.

पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, संचार बंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने ‘निडली’ ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल.

याच बरोबर आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या कापूस खरेदी साठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्र मध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने, उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच खरिपाची तयारी करताना जिल्ह्यात 80 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून सदर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. विवाहाच्या प्रसंगी 20 नातेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी राज्यस्तरावरून निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ना. मुंडे यांनी येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी नागरिकांसाठी पास उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे आत्तापर्यंत 365 अर्ज प्राप्त झाले असून 45 परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी नवीन 30 व्हेंटिलेटर घेण्यात येत असल्याची माहिती दिली गेल्याचे सांगितले .

*बैठकीतूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्याना फोन*

ना. मुंडे हे झटपट व जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यांमध्ये लग्न लावण्यासाठी परवानगी हा विषय निघताच पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे समजते.

होमगार्ड ची संख्या तसेच त्यांचे वेतन यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख त्याचबरोबर विविध आर्थिक नियोजनाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत कृषी मंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांना ना. मुंडेंनी चालू बैठकीतच फोन लावले व विषय मार्गी लावले.

ऊसतोड मजुरांसाठी दिलेला निधीचा योग्य वापर आणि तलाठी ,ग्रामसेवक मुख्यालयी रहात नसतील तर लेखी तक्रार करा― डॉ.गणेश ढवळे

बीड दि.२१:आठवडा विशेष टीम―ऊसतोड मजूर गावी परतले असुन त्यांची काळजी घेण्यासाठी मा.राहुलजी रेखावार साहेब यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असुन १४ वर्मा वित्त आयोगाच्या आरोग्य विषयक योजनेतून कोरोनाच्या संकटकाळी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे ,तो योग्य मार्गाने खर्च होत आहे का??यांची काळजी दक्ष नागरिकांनी घ्यावी आणि काही काळंबेरं असल्यास जिल्हाधिकारी यांना … Read more

संचारबंदी काळात सिरसाळा येथील पोलीसांना झालेल्या मारहाणीतील आरोपींना जामिन मंजुर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― संचारबंदी काळात सिरसाळा (ता.परळी) येथे बुधवार,दि.25 मार्च 2020 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पो.नाईक किशोर कचरू घटमाळ व पो. नाईक जेटेवाड हे कोरोना संचारबंदीचे काळात वडार गल्ली सिरसाळा येथे गेले असता तुकाराम बाबु पवार यांचे घरासमोर पुरूष व महिलांची गर्दी जमलेमुळे त्यांना घरात बसा व संचारबंदीचे नियम पाळा असे पो.ना.घटमळ यांनी राम तुकाराम पवार व इतरांना सांगत असताना अचानक 1) राम तुकाराम पवार,2) श्रीराम बाबु पवार, 3) अशोक तुकाराम पवार, 4) विकास अर्जुन मिटकर, 5) राजु राम लष्करे, 6) विशाल मिटकर, 7) सोनाली राम पवार, 8) सोजरबाई तुकाराम पवार, 9) पप्पु श्रीराम पवार यांनी व इतर 3 जणांनी पोलीस नाईक घटमल व जेटेवाड यांना लाकडाने,विटाने व दगडाने मारहाण केली.त्यात पोलीस ना.घटमल व जेटेवाड हे गंभीर जखमी झाले अशी फिर्याद पो.स्टे. सिरसाळा यांनी बुधवार,दि. 25/03/2020 ला दिल्यावरून त्याची नोंद फा.क्र.63/2020 प्रमाणे गुन्हा कलम 353,307, 332,336,143,147, 149,323,504,506, 188,आय.पी.सी.व कलम 51 (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे नोंद झाला.वरील आरोपींना 25/10/2020 रोजी सुमारे 10 वाजता अटक केली.परळी न्यायालयाने त्यांना दिनांक 26/03/2020 ते 06/04/2020 पर्यंत पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर 16/04/2020 पर्यंत व पुढे न्यायालय कोठडी दिली आहे.वरील सर्व आरोपींविरुध्द पोलीस सिरसाळा यांनी खोटा गुन्हा दाखल केला.सकृत व प्रथम दर्शनी आरोपींविरूद्ध दाखल केलेला आरोप चुकीचा आहे.वैद्यकीय अहवालही संशयास्पद आहे.उलट आरोपीस पोलीसांनी मारहाण केलेच आरोपीचे म्हणणे आहे. आरोपीनी गुन्हा केला नाही. इत्यादी प्रकारची ठोस बाजुचा मे.जिल्हा व सत्र न्यायालयासमोर युक्तीवाद करून पोलिसांनीे सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद आहेत.आरोपींना जामिनवर सोडण्याची मागणी अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी केली.असता मे.सत्र न्यायालयाने वरील सर्व आरोपींना 15 हजार रूपयांचे जामीनवर मुक्त करण्याचे आदेश देवून सर्वांनी दर सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत पो.स्टे.सिरसाळा येथे हजेरी लावणेचा आदेश ही दिला आहे.
संचारबंदी व कोरोना परिस्थितीतील सदरील घटना ग्रामीण भागातील असलेमुळे त्यावेळी राज्यभर दुरदर्शनवर व वर्तमानपत्रात खुप गाजलेली आहे.सदर प्रकरणात आरोपींची बाजु अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके , अ‍ॅड.रणजित सोळंके, अ‍ॅड.एस.ए.पांचाळ, अ‍ॅड.रामेश्‍वर जाधव, अ‍ॅड.शिवराज साळुंके यांनी पाहिली आहे.