खेळता खेळता सापडलेले रक्कम चार वर्षीय बालकाने केले आठ तासातच परत ,सोयगावातील घटना

सोयगाव,दि.१२:आठवडा विशेष टीम― अंगणात खेळत असतांना अचानक डोळ्यासमोर पैशांची रास पाहून चक्रावलेल्या चार वर्षीय बालकाने त्या रक्कमेच्या मालकाचा शोध घेण्यासाठी आठ तास रेस्कू मोहीम हाती घेवून अखेरीस त्याच्या आजीच्या मदतीने या बालकाने पैसे असलेल्या मालकाचा शोध घेवून तब्बल दोन हजार ६५० रु मालकाला परत केल्याची घटना सोयगावातील आमखेडा भागात उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे या चार वर्षीय बालकाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

अथर्व संदीप इंगळे(वय चार,रा आमखेडा भाग) हा घरासमोरील अंगणात खेळत असतांना अचानक त्याला डोळ्यासमोर नोटांचे बंडल आढळून आले पैसे दिसताच या बालकाने शांतपणे ती रक्कम उचलून विचारपूर्वक तासभर शोध मोहीम हाती घेतली अख्ख्या गावभर पैसे कोणाचे आहे हि विचारणा करत असलेल्या अथर्व संदीप इंगळे याला त्याची आजी गंगुबाई रामदास इंगळे ह्या शोधत होत्या अखेरीस अथर्व गावातील बाजूच्या गल्लीत असल्याचे व पैसे घेवून फिरत असल्याचे ग्रामस्थांनी आजी गंगुबाई यांना सांगितल्यावर आजीने नातवाला काय करतोस असे म्हणून हटकल्यावर अथर्व याने आजीला सापडलेल्या पैशा बाबत कहाणी सांगितली त्यावेळी त्यानी सापडलेली रक्कम आजी जवळ दिली.त्यानंतर आजीसह नातवाने पैशांची चौकशी सुरु केल्यावर कोणीही पैशांबाबत माहिती देईना,अखेरीस आजीबाई आणि नातवाच्या मोहिमेची माहिती पैसे हरविलेल्या ज्ञानेश्वर वाडेकर यांचे पैसे हरविल्याची माहिती हाती आल्यावर आजी व नातवाने सापडलेले पैसे वाडेकर यांना गावातील युवराज वामने यांच्या समक्ष परत केले.

शोध मोहिमेत आजीबाईचाही सहभाग―

चार वर्षीय नातवासह ६५ वर्षीय आजीबाईने बालकाच्या या शोध मोहिमेर्त सहभाग घेवून त्यांनी अखेरीस सायंकाळी उशिरा पैसे हरविलेल्या मालकाचा शोध घेवून त्यांना रक्कम परत केल्याने सोयगाव शहरासह तालुक्यात आजीबाई व नातवाचे कौतुक होत आहे.

बनोटी नंतर सोयगावातही माणुसकीचे दर्शन―

बनोटी ता.सोयगाव येथे नुकतेच एक लक्ष रु चे ब्रास्लेट सापडलेल्या तरुणाने महिनाभर शोध मोहीम घेवून शनिवारी त्या ब्रासलेट मालकाचा शोध घेवून ग्रामस्थांसमोर एक लाख रुचे ब्रासलेट परत दिल्यावर सोयगावातही या घटनेची पुनरावृत्ती झालेली असून चार वर्षीय अथर्व इंगळे याने आठ तासातच दोन हजार ६५० रु सापडले असतांना मालकाला परत दिले आहे.त्यामुळे सोयगावचे नाव माणुसकी आणि इनामादारीत जिल्ह्याच्या यादीत कोरले गेले आहे.