पडेगाव-मिटमिटा-छावणी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन
संभाजीनगर (ता.30) : पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेल्या पडेगाव, मिटमिटा व छावणी या भागात आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते ◾️पडेगाव येथील चिनार गार्डन येथे सामाजिक सभागृहाचे भुमिपुजन.◾️पडेगाव येथील गुलमोहर कॉलनी येथे सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन.◾️माजी सैनिक कॉलनी येथे सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन ◾️मिटमिटा येथे सुंदरनगर येथे सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन.◾️छावणी बाजार येथे सामाजिक सभागृहाचे या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच या भूमिपूजन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत व आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज बाळासाहेबाची शिवसेनामध्ये पडेगाव-मिटमिटा या भागातील फिरदोस गार्डन, सप्तशृंगीनगर, रामगोपालनगर, गुलमोहर कॉलनी शिवपुरी उपविभागप्रमुख संजय मोहनिया, अशोक सुखदेव, शाखाप्रमुख उमेश रावसाहेब आम्ले, उपशाखाप्रमुख अमोल हरिचंद्र भंडारे, चंदु बाळुभाऊ पेहरकर, वार्डप्रमुख अशोक रामचंद्र डोके, उपवार्डप्रमुख सुरेश कात्रे, ऋषिकेशवाघमोडे, शाम पेहरकर, गटप्रमुख अमन चव्हाण, उपगटप्रमुख आकाश बलवंत पाटील, धनंजय शिंदे, अमोल बोरडे, गणेश खेकडे, उपगट प्रमुख निखिल नाईक, अमोल ईंगळे, तुषार राजेश कुडेकर, सुमित कल्याणकर, स्वप्निल जोशी,शुभम भालेराव, मुक्तार शबीर सय्यद, उपग प्रमुख सचिन सोनवणे, योगेश भंडारे, नागेश मगर यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देखील देण्यात आले.
आमदार शिरसाट म्हणाले की, आज अनेक युवकांनी बाळासाहेबाची शिवसेना पक्षात मध्ये आमच्यावर जो विश्वास दाखवून प्रवेश केला त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याला कधी तडा जाऊ देणार नाही, या भागात अनेक विकास कामे आपण केली आहे आज ही काही कामाचे भूमिपूजन झाले, लोकांना विकास लागतो त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे याला मी खऱ्या अर्थाने प्राधान्य देण्याचे काम करत असतो, जी विकास कामे आपण करतो तेव्हाच जनता आपल्या पाठीशी उभे राहते, त्यामुळे प्रत्येकाने सामन्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध रहावे आणि आपला पक्ष वाढविण्यासाठी सदैव काम करत राहायला हवे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिंद्धात शिरसाट, शहरप्रमुख संतोष आम्ले, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, अशोक आम्ले, उपशहरप्रमुख गणेश कांबळे, राजु राजपुत, हर्षदा शिरसाट, जिल्हा संघटक शिल्पाराणी वाडकर,उपजिल्हा संघटक जयश्री घाडगे, तालुकासंघटक उषा हांडे, शहर संघटक पश्चिम सुरेखा चव्हाण, शहर संघटक पूर्व गायत्री पटेल, दीपक बनकर, नंदू आम्ले, उमेश आम्ले, भागीनाथ पेहकर, कैलास वाणी, पोपटराव हांडे, अशोक डोके, अशोक माळी, राजू लिंगे, बाळासाहेब आम्ले, गणेश बनगे, स्वप्नील जोशी, सोनू बुटे, अभिषेक बुटे, अमोल ठाकूर, माऊली आम्ले, अक्षय हांडे, अनिकेत कांबळे, अमोल भांडारे, अमोल वाघमारे, सिद्धेश्वर घोळवे आदींची उपस्थिती होती.