औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

तहसील कार्यालयाचे मंजूर वाहन सोयगावला पोहचेना

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळूनही अजूनपावेतो मंजूर झालेले शासकीय वाहन सोयगावला पोहचले नसल्याने महसूल विभागाला भाड्याने वाहने लाऊन कोरोना संसर्गाचे दौरे करावे लागत आहे.चार वर्षापासून सोयगाव तहसील शासकीय वाहनाविना असून या कार्यालयाचे भंगार झालेल्या वाहनाला कीड लागली आहे.त्यामुळे भंगार झालेले वाहन कार्यालयाच्या आवारात उभेच आहे.
सोयगाव तहसील कार्यालयाला वर्षभरापासून शासकीय वाहन नाही.कार्यालयाचे उपलब्ध असलेले वाहन चार वर्षापासून धूळखात पडून उभेच असल्याने या वाहनाला कीड लागली आहे.ऐन कोरोना संसार्गात आणि अतिवृष्टीच्या काळात सोयगाव तहसील कार्यालयाला वाहन उपलब्ध नसल्याने सोयगाव तहसीलदारांना आणि महसूल कर्मचार्यांना खासगी वाहनाने दौरे आटोपते घ्यावे लागत आहे.सोयगाव तहसील कार्यालयाला नवीन शासकीय वाहन मंजूर आहे.परंतु मंजूर झालेले नवीन वाहन अद्यापपर्यंत औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यायातून सोयगावला पोहचलेले नाही.वाहनाची खरेदीही झाली आहे.परंतु वाहन सोयगावला पोहचण्यासाठी शासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्याचे दिसत आहे.सध्या सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे.त्यातच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.त्यासाठी उपाय योजना आणि नियंत्रणासाठी तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांना तातडीचे दौरे खासगी वाहनाने आटोपते घ्यावे लागत आहे.
--------------------------

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    जरंडीच्या कोविड केंद्राला खासगी वाहनाने नियमित भेटी-

    जरंडी आणि निंबायतीला कोविड केंद्रे स्थापन करण्यात आली असून या कोविड केंद्रांना महसूल कर्मचारी आणि तहसीलदार यांना नियमित भेटी द्याव्या लागत आहे.परंतु शासकीय वाहन नसल्याने तहसीलदार यांना खासगी वाहन आणि कर्मचाऱ्यांना मोटारसायकलने या कोविड केंद्रांवर भेटी द्याव्या लागत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर झालेले वाहन सोयगावला पोहचत नसल्याच्या गुंतागुंतीच्या प्रश्नाचे मात्र शासनाला उत्तर सापडत नाही.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.