Last Updated by संपादक
बीड:नानासाहेब डिडुळ उपसंपादक―जिल्ह्यातून पाठवलेल्या स्वॅबपैकी आज दि.19 जुलै रोजी रात्री 1 वाजता प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. आज आणखी 14 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड 6 , परळी 5 , आष्टी 1 , अंबाजोगाई 1 , गेवराई 1 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 317 + 14 = 331 झाली आहे. तर 174 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 133 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान बीड शहरातील राजू नगर भागातील एका 29 वर्षीय कोरोना बाधित रुग्णावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र याबाबत बीडच्या पोर्टलला याची उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती.
बीड 6 – 46 वर्षीय महिला ( रा विद्यानगर पश्चिम बीड, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ) , 78 वर्षीय पुरुष (रा.सावतामाळी चौक, बीड शहर), 60 वर्षीय महिला ( रा शिवनेरी कॉलनी ईमामपुर रोड,बीड) , 70 वर्षीय पुरुष (रा.भद्रा मारूति नगर, कॅनॉल रोड,बीड) , 50 वर्षीय (रा.गणपती मंदीरा जवळ शाहुनगर,बीड), 45 वर्षीय पुरुष ( कारंजा , खंदक बीड )
गेवराई 1 – 55 वर्षीय पुरुष { ता.गेवराई )
परळी 5 – 24 वर्षीय पुरुष (रा गुरुकृपा नगर,परळी) , 38 वर्षीय पुरुष (रा. जुने रेल्वेस्टेशन,परळी पॉझिटिव रुग्णाचा सहवासीत) , 31 वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा महवासीत ) , 23 वर्षीय पुरुष ( भोई गल्ली, परळी पपॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासित), 60 वर्षीय पुरुष (रा.बरकतनगर,परळी, जि रु.नांदेड येथे दाखल)
आष्टी 1 – 38 वर्षीय पुरुष खीळद
अंबाजोगाई 1 – 63 वर्षीय पुरुष (रा.आदर्श नगर,अंबाजोगाई पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासित )