न्यू व्हिजन पब्लिक स्कुलला मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट शाळा बनविणार – राजकिशोर मोदी

Last Updated by संपादक

सिबीएसई अभ्यासक्रमाच्या 10 वी आणि 12 वी गुणवंतांचा सत्कार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
दिल्ली,मुंबई व पुण्याच्या धर्तीवर अंबाजोगाई इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या भुमिकेतून न्यू व्हिजन पब्लिक स्कुल ही शाळा सुरू करण्यात आली.सतत 9 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेेचे माजी विद्यार्थी देश व परदेशात मोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून शैक्षणिक क्षेत्रात संस्था व शाळेने ‘अंबाजोगाई पॅटर्न’ निर्माण केला आहे.शाळेचे शिक्षक हे आंध्रप्रदेश,कर्नाटक व केरळ येथील उच्चविद्याविभूषीत आहेत.गतवर्षी संस्थेचे सहा विद्यार्थी वैद्यकिय तसेच अनेक विद्यार्थी हे अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.नर्सरी,एल.के.जी,यू.के.जी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.संस्थेच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत स्पर्धा परिक्षेसह इतर परिक्षेत ही विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहोत.येणारा काळ स्पर्धेेचा आहे.त्यामुळे मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट शाळा बनविण्याचा संकल्प केला असून पुढील काळात ते दिसून येईल इयत्ता 10 वी व 12वी तील गुणवंत विद्यार्थी यांनी अंबाजोगाईचे नांव उंचावले असल्याचे प्रतिपादन श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी यांनी केले.

शहरातील प्रशांतनगर भागातील सहकार भवन येथे शनिवार,दि. 18 जुलै रोजी इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करणा-या न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या व होरायझन अ‍ॅकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,डॉ.डी.एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण, डॉ.विवेकानंद राजमाने,प्रा.पी.ए.कुलकर्णी,प्रा.एस.ए.बिराजदार पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार,पत्रकार अविनाश मुडेगावकर,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक सुनिल व्यवहारे,अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संचालक सचिन बेंबडे,श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी न्यु व्हिजन पब्लिक स्कुलचे इयत्ता 10 वी वर्गातील विद्यार्थी सुयश लक्ष्मीकांत बगले (98.60 टक्के),अनुराग आनंद नागापूरे (97 टक्के),अर्जुन संजय शेटे (96.80 टक्के),पार्थ राहुल देशमुख (95.60 टक्के),रागिनी मनिष गुंडरे (95.20 टक्के), शुभम सुशिल कुलकर्णी (94.80 टक्के),आदित्य अजय चौधरी (94.80 टक्के) तसेच इयत्ता 12 वी वर्गातील सागर संपत बलवंत (86.02 टक्के),ऋषिका सचिन कात्रेला (85 टक्के),आदिबा फातीमा शेख (82.08 टक्के) या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून,शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थी पालक डॉ.भालचंद्र गुंडरे तसेच विद्यार्थी सागर बलवंत विद्यार्थीनी आदिबा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांनी सांगितले की, संकेत मोदी यांच्या रूपाने बालाजी शिक्षण प्रसारक मंडळात शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागणारे बदल होत आहेत हे अभिनंदनीय आहे.न्यु व्हिजनच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने महाराष्ट्रात अंबाजोगाईचे व संस्थेचे नांव उंचावले आहे.पालक व विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी लातूरला जाण्याची गरज नाही कारण,होरायझन अ‍ॅकॅडमी व न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या माध्यमातून नांदेड,लातूर,पुणे येथे मिळणारे शिक्षण आता अंबाजोगाईतच मिळत आहे.विश्‍वास ठेवा.मुलांना जे हवे ते आम्ही देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू चिंता करू नका.पालकांनी आम्हाला भेटून बोलावे सुचना कराव्यात त्यानुसार बदल केले जातील अशी ग्वाही प्राचार्य
डाॅ.खडकभावी यांनी दिली.डॉ.डी.एच थोरात यांनी कोरोना लॉकडाऊन काळात ऑनलाइन शिक्षण सुविधा न्यू व्हिजन पब्लिक स्कुलने दिल्याचे सांगुन पालक विद्यार्थ्यांना शहराबाहेर पाठविण्यास तयार नाहीत.त्यामुळे आता अंबाजोगाई बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. कारण,न्यू व्हिजन पब्लिक स्कुल व होरायझन अ‍ॅकॅडमी दर्जेदार शिक्षण देत आहेत असे प्रतिपादन डॉ.थोरात यांनी केले सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार विनायक मुंजे यांनी मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.