परळीत भाजपचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन ; लाॅकडाऊन काळातील व्यापाऱ्यांचे वीज बिल, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची केली मागणी

Last Updated by संपादक

परळी दि.२०:आठवडा विशेष टीम– पंकजाताई मुंडे आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने बीड जिल्हयात वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज झालेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून परळीत संचारबंदी असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना निवेदन देण्यात आले, लाॅकडाऊन काळातील शेतकरी आणि व्यापा-यांचे वीज बिल माफ करावे तसेच सर्वसामान्य ग्राहकांचे वाढीव वीजेची बिले कमी करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महावितरण वीज कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रिडिंग न घेता अवाजवी बिलाची आकारणी होत आहे. कोरोना महामारीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्व सामान्य जनता आर्थिक कोंडीत सापडली असताना वीज कंपनी मात्र जाणूनबूजून अन्याय करत आहे. या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी पंकजाताई मुंडे व खासदार डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपच्या वतीने वीज कंपनीला निवेदन देण्यात आले. लाॅकडाऊनच्या काळात व्यापा-यांची दुकाने बंद होती, त्या बंद काळातील वीज बिल माफ करावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, घरगुती वापराच्या मीटरचे रिडिंग न घेता लावलेले वाढीव बिले कमी करून द्यावे अशी मागणी करणारे निवेदन वीज कंपनीला तर नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लाॅकडाऊन कालावधी आता वाढवू नये अशा मागणीचे निवेदन उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख्, जीवराज ढाकणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नीळकंठ चाटे, रवि कांदे, उमेश खाडे, पवन मुंडे, राजेंद्र ओझा, नितीन समशेट्टे, योगेश पांडकर, श्रीराम मुंडे, अरूण पाठक विजयकुमार खोसे, गोविंद चौरे,रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.