औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसोयगाव तालुका

समाज प्रबोधन करणारे कलावंत वळले शेतीच्या कामाकडे ,सोयगाव तालुक्यातील प्रकार

सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
समाजाला जगण्याची दिशा देवून स्वतःच्या कुटुंबाची खळगी भरणाऱ्या या हरहुन्नरी समाज कलावंतांना कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन मुळे थेट शेतात कोळपणीच्या कामांना जावे लागत आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी या कलावंतांनी शेतीकडे कल दिला असून बनोटी ता.सोयगाव येथील लोकप्रिय मिमिक्री करणारा कलावंत सिद्धार्थ सोनवणे यांनी मात्र थेट शेतात कोळपे धरले आहे.
बनोटी ता.सोयगाव येथील समाजाचे प्रबोधन करून आपल्या कलेकडे वळविण्याचे तब्बल १५ वर्षापासून कार्य करत होता.राजकीय,अभिनेते,विविध कलाकार,राजकीय पटलावरील नेते,विविध प्राणी असे १५० हुबेहूब आवाज काढून नागरिकांचे मनोरंजन करणाऱ्या या कलाकाराला मात्र कोरोना संसर्गाने थेट शेतावर पाठविले आहे.राज्यात मिमिक्री करून लोकप्रिय झालेल्या सिद्धार्थ सोनवणे यांनी आता मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी थेट शेतीकामाकडे मन वळविले आहे.राज्यात या कलावंताने तब्बल सात हजाराच्यावर प्रयोग केले आहे.मात्र कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या या सोयगावच्या मिनी भाऊ कदम उर्फ सिद्धार्थ सोनवणे यांनी शेतीकामाचा वसा धरला आहे.

राज्यात लोकप्रिय झालेला बनोटीचा सिद्धार्थ हा एका मिनिटात तब्बल चाळीस आवाज काढतो,त्याच्या या कलेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे.कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्याने चक्क १५ वर्षापासून विनोदाचा आधार घेतला आहे.परंतु कोरोना संसर्गाने मात्र त्याच्या कुटुंबीयाशी चक्क विनोदच केलेला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.शालेय विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी सर्वांना खळखळून हसवावे या उद्देशाने सिद्धार्थने संपूर्ण महाराष्ट्र फिरून प्रत्येक शाळेत हास्य एक्स्प्रेस घेवून जाणारा हा सिद्धार्थ सोनवणे मात्र कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन मुळे उपासमार होत आहे.त्यासाठी त्याने चक्क शेतीकामाकडे मन लावले आहे.

शेतीच्या रोजंदारीवर उदरनिर्वाह-

शेतीच्या रोजंदारीवर कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी या हरहुन्नरी कलावंताने शेतीच्या कामात मन रमवून शेतातही काम करतांना त्यांनी मजुरांचे मनोरंजन थांबविलेले नाही.यापूर्वी या कलाकाराने चार मराठी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते यांचेसोबत काम केलेले आहे.लिम्का बुक विक्रमासाठी त्याची घोडदौड चालू असतांना अचानक कोरोना संसर्गाने मात्र त्याचे स्वप्न हिरावून घेतले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.