Last Updated by संपादक
सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला सरसगट १० रु प्रती लिटर अनुदान व दुध पावडरसाठी ५० रु प्रती किलो भाव देण्यात यावा अन्यथा दि.१ आगस्टला राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन छेडणार असल्याचे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केले आहे कि,राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे.बँकांकडून नाकारला जाणारे कर्ज,त्यातच खतांचा तुटवडा आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला दुध उत्पादक करण्याकरिता गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु अनुदान आणि दुध पावडरला प्रती किलो ५० रु असा भाव देण्याच्या मागणीसाठी तालुका भाजपच्या वतीने सोमवारी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात या मागण्यांबाबत दि.१ आगस्ट ला राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन छेडणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे,निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे,पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,मंगेश सोहनी,युवमोरचा तालुकाध्यक्ष संजय चव्हाण,शहरध्यक्ष सुनील ठोंबरे,संभाजी पवार,समाधान सूर्यवंशी,नंदू शेळके,विशाल चव्हाण,रऊफ देशमुख,योगेश देसले,ललित वानखेडे,दत्तू ढगे,शांताराम पाटील,आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.