ब्रेकिंग न्युज

निमगाव चोभा शिवारात १७० पोते कोळसा जप्त ;आष्टीच्या वनपरिक्षेत्र कार्यालयाची कारवाई

आष्टी:अशोक गर्जे― आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या घटना होत असताना सोमवारी (ता.२०) निमगाव चोभा परिसरातील कांबळी नदीकाठी वृक्षतोड करून त्यापासून १७० पोते कोळसा गोळा करून विक्रीसाठी लपून ठेवला होता. सदरील घटनेची माहिती आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांना कळताच त्यांनी वनपाल सी एम महाजन तसेच वनरक्षक अनिल जगताप यांना सदरील ठिकाणी जाऊन कारवाईचे आदेश दिले. सदरील निमगाव चोभा शिवारातील कांबळी नदीच्या काठावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली कोळशाने भरलेली १७० पोते जप्त करून दिलीप श्रीराम राठोड (रा. पिंपरखेड, ता.आष्टी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.