औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

कोरोना रुग्णाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जरंडीला भाजपचा थेट संवाद ,जरंडी कोविड केंद्रात साधला रुग्णांशी संवाद

सोयगाव,दि.२१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या कचाट्यात अडकलेल्या दहा रुग्णांशी भाजपाच्या वतीने मंगळवारी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.भाजपाच्या वतीने जरंडी ता.सोयगाव येथील कोविड केंद्राच्या भेटीदरम्यान भाजपाचे प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी,जेष्ठ्नेते सुरेश बनकर,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे यांनी थेट कोविड केंद्राला भेट देवून खिडकीतून रुग्णांशी अर्धा तास संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्यांना धीर दिला आहे.यामुळे रुग्णांनी मनोबल वाढल्याची पहिली प्रतिक्रिया या चर्चेदरम्यान दिली.
जरंडी ता.सोयगाव कोविड केंद्राला भाजपाच्या वतीने संवाद उपक्रमासाठी मंगळवारी भेट देवून त्यांचेशी संवाद साधला यावेळी इद्रीस मुलतानी यांनी तब्बल दहा मिनिटे रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृती विषयी चर्चा केली.तसेच जेष्ठ्नेते सुरेश बनकर , तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे यांनीही त्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेत त्यांचे मनोबल उंचावले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांचेकडून भाजप प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी यांनी रिक्त पदे,रुग्णांच्या जेवणाच्या,अंघोळीच्या व्यवस्थेची माहिती घेवून आढावा घेतला.या भेटीदरम्यान रुग्णांना व्हीटॅमीन-सी गोळ्या नसल्याचे उघड झाल्याने तातडीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जरंडी कोविड केंद्रात तातडीने या औषधसाठ्यचा पुरवठा करून या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे भरण्याबाबत सूचना दिल्या आहे.पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,गुरुदास पाटील,समाधान सोनवणे(घोसला)भिवा चव्हाण,बद्री राठोड,अमृत राठोड,आदींची उपस्थिती होती.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.