Last Updated by संपादक
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी अंबाजोगाई नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगार महिला व पुरूषांना सोमवार,दिनांक 20 जुलै रोजी सॅनिटायझर,मास्क वाटप आणि वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला.यासाठी त्यांना विशाल मुंदडा,राजेश भिसे,धनंजय हावळे,आकाश भिसे,राजेश गुट्टे,रवि लाड,प्रविण भिसे,दत्ता पवार,राहूल कांबळे,महेश पवार,गणेश जाधव,ज्ञानेश्वर मगर,गणेश पटाईत,
अविनाश चोपडे,इब्राहिम पटेल,प्रफुल्ल कोमटवार,राहूल बुरगे,जालिंदर तोडकर,राहूल शेळके,राजेश दरेकर,हर्षल लखेरा,उमेश खरात,रवि काचरे यांचेसह मिञपरीवाराचे सहकार्य लाभले.गंभीरे परिवाराच्या वतीने लॉकडाऊन काळात मोफत भोजन,अन्नदान,गरजूंना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले.हा उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संचारबंदीमुळे सरकारच्या निर्देशाचे पालन करीत गर्दी होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली गेली.शासन आदेशाचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी दिली.