तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद ,1083 विद्यार्थी सहभागी ; दोन गटात स्पर्धा

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील
संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीने
सोमवार,दिनांक 20 जुलै रोजी आयोजित तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तालुक्यातील 37 शाळेचे तब्बल 1083 विद्यार्थी सहभागी झाले.ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.

IMG 20200722 WA0004

सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांचे वाढदिवसानिमित्त संकल्प विद्या प्रतिष्ठान अंबाजोगाई यांनी तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.स्पर्धेत इयत्ता 3 री ते इयत्ता 6 वी लहान गटात 412 तर इयत्ता 7 वी ते इयत्ता 10 वी मोठ्या गटात 671 असे एकूण मिळून 1083 विद्यार्थी सहभागी झाले.हि स्पर्धा मराठी व इंग्रजी भाषेतून दोन गटात घेण्यात आली.स्पर्धेसाठी 50 प्रश्न,100 गुण आणि वेळ 1 तास दिला गेला.विजेते विद्यार्थी गट 3 री ते 6 वी-कृष्णा विलास गंगणे (प्रथम),सार्थक गणेश जाधव (द्वितीय),गट 7 वी ते 10 वी पियुष उध्दव आपेट (प्रथम),प्रतिक्षा सुभाष डोलारे (द्वितीय) यांना सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व प्रथम विजेत्यास 1051/- रूपये तर द्वितीय विजेत्यास 551/- रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण संजय गंभीरे,नामदेव मुंडे,कैलास चोले,श्रीमती रेखा बडे,श्रीकांत खुणे या मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आले.यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.तर आपल्या वाढदिवसानिमित्त सामान्यज्ञान स्पर्धेसारखा स्तुत्य उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना
प्रोत्साहीत केल्याबद्दल संजय गंभीरे यांनी आयोजकांचे कौतुक केले.संकल्प विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस.बडे यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक संकल्प विद्या प्रतिष्ठान,संजय गंभीरे मित्र मंडळ यांनी पुढाकार घेतला.यावेळी विशाल मुंदडा,राजेश भिसे,धनंजय हावळे,आकाश भिसे,राजेश गुट्टे,रवि लाड,प्रविण भिसे,दत्ता पवार,राहूल कांबळे,महेश पवार,गणेश जाधव,ज्ञानेश्वर मगर,गणेश पटाईत,अविनाश चोपडे,इब्राहिम पटेल,प्रफुल्ल कोमटवार,राहूल बुरगे,जालिंदर तोडकर,राहूल शेळके,राजेश दरेकर,हर्षल लखेरा,उमेश खरात,रवि काचरे यांचेसह मिञपरीवार उपस्थित होता.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.