Last Updated by संपादक
दारूबंदीसाठी रणरागिणी रस्त्यावर, पोलिसयंत्रणेतच घरभेदी, बीट अंमलदारापासून पोलिस अधीक्षकापर्यंत हफ्ता देतोय , दारूबंदी शक्यच नाही,दारूविक्रेत्यांची दर्पोक्ती – डॉ.गणेश ढवळे
पाटोदा दि.२२:आठवडा विशेष टीम― पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा येथिल महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला असुन पाटोदा पोलिस ठाणे सह पोलीस अधिक्षक कार्यालयाचे दार ठोठावले आहे, परंतु त्यानंतर महिलांना अर्वाच्च शिविगाळ व धमक्यांना सामोरे जावे लागत असुन पोलिस यंत्रनेतीलच घरभेदी छापा टाकण्यापुर्वी दारुविक्रेत्यांना सुचना देत आहेत.त्यामुळे बीड दारूबंदी रथ पथकाला हाथ हालवत जावे लागले, पोलिस यंत्रणेतील हफ्तेखोरीमुळे दारूबंदी होत नसल्याचा आरोप दोन वेळेस दारूबंदिचा ठराव देणाऱ्या ग्रां.पं.स.यांनी केला आहे.
नव-याचं आयूष्य दारूपाई बरबाद झालंय निदान मुलांच तरी होऊ नये,टपरी, किराणा दुकानात सुद्धा दारू मिळायला लागलीय, पोरं झिंगत घरी येतेत, निदान त्यांच्याकडं बघुन तरी दारूबंदी करावी.
पोलिस अधीक्षक, दारूबंदी कार्यालयात गेलो,जास्तच त्रास वाढलाय –मनिषा जोगदंड/ मीना बांगर/आशा वाघमारे
आम्ही दि. १४ जूलै रोजी पोलिस ठाणे पाटोदा येथे तर १७ जुलै रोजी पोलिस अधीक्षक व दारुबंदी कार्यालयात तक्रार दाखल केली त्यानंतर त्रास कमी होण्याऐवजी दारुड्याकडुन शिविगाळ केली जाते,धमक्या दिल्या जातात, बीट अंमलदार पासुन पोलिस अधीक्षक सगळ्यांना हफ्ता जातो त्यामुळे तुम्ही कितीही पळालात तरी दारूबंदी होणार नसल्याची दर्पोक्ती दारूविक्रेते करतात.
बाबासाहेब बांगर / बाळासाहेब बांगर/अशोक बांगर/ सतिश वाघमारे/यमुनाबाई डांगर/अनिल बांगर ― पोलिसच घरभेदी
वाघिरा गावचे उपसरपंच,ग्रां.पं.स.यांनी दोन वेळा दारूबंदीसाठी ग्रांमपंचायतचा ठराव मंजूर करून दिला आहे, परंतु पोलिस प्रशासन दारुविक्रेत्यांना पाठीशी घालत आहे, छापा पडण्याच्या अगोदरच दारूविक्रेत्यांना पुर्वसुचना दिली जाते , त्यामुळेच बीड येथिल दारूबंदी खात्याने छापा घातला तरी त्यांना हात हलवत माघारी जावे लागते. पोलिस प्रशासनातील घरभेदी कोण??हफ्तेखोर कोण याची चौकशी होणे गरजेचे आहे.
१० ऑगस्ट ला रास्ता रोको आंदोलन – डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते
वाघिरा गावातील महिलांना न्याय मिळण्यासाठी दारुबंदी व्हावी त्यांना धमकावणा-यांना व बीट अंमलदारापासून पोलिस अधीक्षक बीड यांच्या पर्यंत हफ्तेखोरी चालते त्यामुळे दारूबंदी शक्य नाही अशी दर्पोक्ती करून पोलिस प्रशासनाला बदनाम करणा-या दारुविक्रेत्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दि. १० ऑगस्ट २०२० रोजी वाघिरा फाट्यावर मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा ईशारा दिला आहे.