अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

अंबाजोगाईला पाणी पुरवठा करणाऱ्या काळवटी साठवण तलावाचे जलपुजन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
शहरासाठी राखीव पाणीसाठा म्हणून उपयोगात येणारा काळवटी तलाव यावर्षी जुलै महिना संपण्या अगोदरच तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे.बुधवार,दिनांक 22 जुलै रोजी काळवटी तलावाच्या वाहत्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले.

सोमवारच्या मुसळधार पावसानंतर मंगळवारी पहाटे काळवटी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले.पावसाळा सुरू झाल्यानंतर अवघ्या महिना भरातच हा तलाव ओव्हरफ्लो होण्याची मागील कित्येक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने बुधवारी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती दिलीपराव काळे,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक अनिसोद्दीन अन्सारी,नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक सुनील व्यवहारे,अंबाजोगाई नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता मनिषा कोंडेकर,निरीक्षक अरूण कुरे आदींनी काळवटी साठवण तलावाची पाहणी करून वाहत्या पाण्याचे जलपुजन केले.यंदा दररोजच चांगला पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक वेगाने झाली आणि मंगळवारी पहाटे हा तलाव पूर्ण भरला आहे.सांडव्यावरून पाणी वाहू लागले.कोरोनाच्या तणावपूर्ण वातावरणात ही बातमी माञ अंबाजोगाईकरांना निश्चितच सुखावणारी आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने बुधवारी जलपुजन करण्यात आले.

काळवटी साठवण तलावाची उंची वाढवून वाण नदीवर धरण बांधा

अंबाजोगाई शहराला मुख्यत्वे धनेगाव धरणातून पाणीपुरवठा होतो.त्यातील पाणी
संपल्यानंतर काळवटी तलावातून शहराला पाणी पुरविल्या जाते.राखीव साठा म्हणून वापरता येणा-या या तलावाचे अंबाजोगाईकरांसाठी अनन्यसाधारण महत्व आहे.अवघी १.४१५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास शहराला ५ ते ६ महिने पाणी पुरते.मागील चार-पाच वर्षांपूर्वी धरण कोरडे पडले होते.त्यावेळी काळवटी साठवण प्रकल्पातून रविवार पेठ फिल्टर ते कारखाना फिल्टर या ठिकाणी जोडणारी 10 इंच पाईपलाईन नगरपालिकेच्या वतीने टाकण्यात आली.या माध्यमातून त्यावेळेस या पाण्याचा उपयोग झाला.कारण,तेव्हा लातूरला महिना-दोन महिन्यांनी एकदा पाणी पुरवठा व्हायचा परंतु,काळवटी साठवण तलावामुळे अंबाजोगाईला माञ दर पंधरा दिवसाला व नियमित पाणी पुरवठा करण्यात पालिका यशस्वी ठरली होती.वाढत्या शहरीकरणामुळे अंबाजोगाईला पाण्याची मोठी मागणी आहे.50 किलोमीटर अंतरावरील धनेगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा करावा लागतो.यासाठी नगरपालिकेचा विज बिलावरील खर्च मोठा आहे.यामुळे काळवटी साठवण तलावाची उंची वाढवा तसेच वाण नदीवर धरण बांधावे या दोन जुन्याच मागण्या आहेत.मागील सरकारने काळवटी साठवण तलावाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली आहे.त्यामुळे उंची वाढविण्याचे मंजूर झालेले काम त्वरित सुरू करावे.

–राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.