बीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

दत्ता वाकसे यांनी जाणुन घेतल्या मेंढपाळाच्या व्यथा..!

बीड:आठवडा विशेष टीम― संपुर्ण जगामध्ये कोरोना सारख्या रोगाने खुप मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे त्यामुळे संपूर्ण आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे आणि कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील डोंगरद-यात भटकंती करणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा मात्र आहे तशाच्या आहेत शासनाने मेंढपाळ समाजाला न्याय मिळवून दिलेले नाही आणि त्याच्यावर भटकंती करण्याची वेळ येताना दिसत आहे यांच पार्श्वभूमीवर धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी गेल्या तीन महिन्यापासून मेंढपाळांना अन्न धान्य, त्याचं बरोबर त्यांना आर्थिक मदत करण्यात त्यांनी समाजातील शंभर अधिकारी वर्गाची साथ घेत त्याच्यापर्यंत अन्नधान्य आर्थिक मदत पोहोचण्याचे काम गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी जवळपास दोनशे-तीनशे मेंढपाळापर्यंत केलेले आहे बीड जिल्ह्यातही खेड्यापाड्यांमध्ये त्याचबरोबर यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाड्यातील धनगर समाजातील मेंढपाळ भटकंती करताना दिसत आहेत त्यात पार्श्वभूमीचा आढावा घेत आज धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी बीड-परळी हवेवर मेंढपाळांच्या व्यथा जाणून घेत त्यांना आधार देण्याचे काम देखील त्या ठिकाणी त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांना काही अडचणी असतील तर सतत संपर्कात रहा त्याचबरोबर कुठेही वनाधिकारी त्रास देत असतील तर तेव्हां अधिकार्याला देखील त्या ठिकाणी जाब विचारण्याचे काम गेल्या काही दिवसापूर्वी दत्ता वाकसे यांनी केलेला सामाजिक बांधिलकी जोपासत ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात मेंढपाळाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी व्यथा मांडण्याचे काम ते सतत करत असतात त्याच बरोबर ते मेंढपाळाच्या समस्या सोडवण्याचे काम देखील ते करत आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.