सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने बुधवारी तालुक्यातील काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते,मात्र शहरात मुसळधार पावूस झाल्याने शहराच्या काही भागात पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला होता.त्यातच सोयगावच्या सोना नदीला मोठा पूर आल्याने सोना नदी दुथडी भरून वाहत होती.
सोयगाव शहराला बुधवारी दुपारी अचानक मुसळधार पावसाने तडाखा दिला.तालुक्याच्या काही भागांना मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने तालुक्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.दरम्यान सोयगाव शहर परिसरात मुसळधार पावूस झाल्याने सोयगावच्या काही भागात नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने मोठा गोंधळ उडाला होता.सखल भागात पाणीच पाणी शिरले होते.वेताळवाडी धरण ओव्हर फ्लो झाल्याने सोना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते.जरंडी भागातही पावसाने मोठा तडाखा दिला होता.त्यामुळे नदी काठच्या निंबायती,रामपुरा,निंबायती गाव या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.
——————————
सोयगाव शहरात पावसाचा धुमाकूळ-
सोयगाव शहरात दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने मोठा कहर केला होता.शहराच्या काही भागात पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठ पाण्यात होत्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने गोंधळ उडाला होता.मुख्य बाजार पेठ पाण्यात आल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती.
—————————-
सोना नदीची दुथडी-
शहराची मुख्य नदी सोना नदी मात्र दुथडी भरून वाहत होती सोना नदीच्या पुराने मात्र बुधवारच्या पावसात विक्रमी नोंद केली होती.अजिंठ्याच्या डोंगर रांगात जोरदार पावसाने मुसंडी मारल्याने नदीच्या पात्राला मोठा पूर आला होता.