बीड जिल्हाबीड शहरब्रेकिंग न्युजसामाजिक

बीड: शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी शौचालय मूलभूत सुविधांची कमी ,मात्र रोगराई पसरविण्याची शंभरटक्के हमी – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात शौचालय सुविधाच नाही, दारुच्या बाटल्या आणि दगडगोट्यांनी खचाखच भरलेले,घाणीचे साम्राज्य असणारे शौचालय आहे.


पिण्याच्या पाण्यासाठी जारचे पाणी–

पिण्याच्या पाण्यासाठी” वरद डेव्हलपर्स” यांनी बांधलेले टाकी आहे, परंतु अस्वचछता असल्याने लोक विकत जारचे पाणी पितात. एवढंच नव्हे तर शासकीय अधिकारी व कर्मचारी सुद्धा विकत जारच्या पाण्यावरच तहान भागवतात.


बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असणारे दररोज कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना शौचालय, लघुशंकेसाठी व्यवस्थाच नाही, अस्तित्वात असलेल्या पुरूष शौचालय दारुच्या बाटल्या आणि दगडगोट्यांनी खचाखच भरलेले असुन घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

वरिष्ठ लिपिक गोपवाड –पाण्याअभावी शौचालय बंद अवस्थेत :

मुद्रांक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक गोपवाड यांना या ठिकाणी येणा-या नागरिकांचीच नव्हे तर येथिल कर्मचारी यांना सुद्धा शौचालय व लघुशंकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. याचवेळी येथिल पुरूष कर्मचारी उघड्यावर लघुशंका करताना आढळून आले आहे.

जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय कार्यालयांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी – डॉ गणेश ढवळे

बीड शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये याठीकाणी येणा-या नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, पिण्याचे पाणी, शौचालय या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे, परंतु मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहात दारुच्या बाटल्या, दगडगोटे युक्त शौचालय व घाणीचे साम्राज्य पसरले असुन साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय कार्यालये यांना तात्काळ मुलभुत सुविधा पुरवावी यासाठी जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांना लेखी निवेदन दिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button