लिंबागणेश/बीड:आठवडा विशेष टीम― आज दि. २४/०७/२०२० रोजी बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश येथिल आरोग्य सहाय्यक काल दि. २३/०७/२०२० रोजी दिलेल्या स्वॅब तपासणीत बाधित आढळून आला आहे.
त्यामुळे आज सकाळी ११:४० वा. साप्ते आरोग्य कर्मचारी पाली उपकेंद्र यांचा फोन आला. स्वॅब तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना बीडला बोलावून घेतले आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बाधित रुग्ण आरोग्य सहाय्यक त्यांची कामे
त्यांचे कार्यक्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश अंतर्गत सर्व गावांमध्ये पर्यवेक्षण करण्याचे काम होते. त्यांना बाहेर जिल्ह्यातील आलेल्या लोकांना भेटून आरोग्य विषयक जनजागृती, त्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाला देणे, नियमित लसीकरण करणे आदि.कामे करण्यात येत होती. ते बीड येथे स्थायिक असून येणे जाणे करत होते.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश–
नागरीकांनी घाबरून जाऊ नये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्या स्वाब तपासणीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तो पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहावे, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्य प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, कलम १४४ लागु असल्यामुळे गर्दि करू नये.