गोंदिया:राहुल उके― श्री. मंगेश शिंदे,पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतून आदिवासी भागातील अदिवासी बांधवांना शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.
पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. मंगेश शिंदे, यांचे संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी , उपविभागिय पोलीस अधिकारी आमगांव जालींदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपारचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जमदाडे यांचे उपस्थितीत दिनांक 24/07/2020 रोजी पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील मौजा नवाटोला (कोटरा) येथे “नक्षल दमन सप्ताह जुलै-2020” अन्वये आदिवासी भागातील अदिवासी बांधवांना शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमा दरम्यान,सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे व ,पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे यांनी मौजा नवाटोला (कोटरा) येथील ग्राम वासियांना भात शेती बाबत मार्गदर्शन करुन आधुनिक प्रकारची शेती करावी व त्याद्वारे जास्तीत जास्त उत्पन कसे वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेती व्यवसायाला जोड धंदा म्हणुन कुकुट पालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय करुन याद्वारे आपली आर्थिक बाजु बळकट कशी करता येईल तसेच याबाबत माहीती देवुन कुकुट पालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय नियोजन बद्द पध्दतीने करुन कशा प्रकारे जास्तीत जास्त आर्थिक उत्पन घेतले जाते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.