अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― शहरातील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने तालुक्यातील वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेत बुधवार,दिनांक 22 जुलै रोजी फिजीकल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून वृक्षारोपण करण्यात आले.योगेश्वरी रोटरी क्लब हा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवते.योगेश्वरी रोटरीचे अध्यक्ष पद्माकर सेलमोकर यांनी सांगितले की,आपल्या अध्यक्षतेखाली होणारा हा पहिलाच उपक्रम आहे.पत्रकार नागेश औताडे यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्त योगेश्वरी रोटरी त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन करते.पुढील काळात वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेत आपण मदत करणार आहोत. याप्रसंगी पत्रकार नागेश औताडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,आज पत्रकारिता क्षेत्रात काम करताना समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचावे लागते.बातमीचा मागोवा घ्यावा लागतो.आपल्या जन्मदिनानिमित्त 2 वर्षांपूर्वी सदर गोशाळेत चारा वाटप करण्यात आला.तसेच गाईंचे लसीकरण करून वृक्षारोपण करण्यात आले.आज प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.योगेश्वरी रोटरीच्या माध्यमातून सतत समाजाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत हे कौतुकास्पद असल्याचे पञकार औताडे म्हणाले.योगेश्वरी रोटरीचे माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी यांनी सांगितले की,योगेश्वरी रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करण्यात येते.यासाठी समाजातील विविध घटकांचा पाठिंबा व सहकार्य मिळत असल्याचे श्रीरंग चौधरी यांनी नमुद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेचे संचालक अॅड.अशोक मुंडे यांनी केले.सुत्रसंचालन सुनिल सिरसाट यांनी करून उपस्थितांचे आभार योगेश्वरी रोटरीचे सचिव पुरूषोत्तम वाघ यांनी मानले.या कार्यक्रमास जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे शिवाजीराव खोगरे,आधार माणुसकीचे प्रमुख अॅड.संतोष पवार,योगेश्वरी रोटरीचे माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी,योगेश्वरी रोटरीचे अध्यक्ष पद्माकर सेलमोकर,सचिव पुरूषोत्तम वाघ आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.