पाटोदा: लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वैतागून वाघिरा ते मेंगडेवाडी रस्त्यासाठी रस्त्यावर उतरणार – डॉ गणेश ढवळे

पाटोदा दि.२६:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील वाघिरा गाव वाघिरा गावाच्या ग्रामपंचायतला संलग्न असलेल्या मेंगडेवाडी ग्रामस्थांना वाडीला जायला साधा रस्ता नाही.पालकमंत्र्यांना ,मुख्यमंत्रांना देखील गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने दिली मात्र रस्ता काय होत नाही. पालकमंत्री धनंजय मुंडे पासुन सुरेश धस, बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर आदि. लोकप्रतिनीधींना वारंवार रस्त्यासाठी निवेदन देऊन वैतागलेल्या मेंगडेवाडी ग्रामस्थांनी अखेर रस्त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.मुळात लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरता मेंगडेवाडी ग्रामस्थांचा वापर करताना दिसत आहेत.त्यांना रस्त्याचं देणं घेणं नसल्याचं दिसत आहे.ह्यावेळी तरी रस्त्याचा प्रश्न सोडवतील अशी आशा मेंगडेवाडी व वाघिरा येथील ग्रामस्थ आहे.

पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडेवाडी अंदाजे ७०० लोकसंख्या असलेल्या वाडीत १ ते ४ ती पर्यंत शाळा, पुढील शिक्षणासाठी शाळकरी मुलांना वाघिरा, लिंबागणेश ,वैद्यकिन्ही या ठिकाणी जावे लागते. वाघिरा ते मेंगडेवाडी ३ कि.मी.अंतर ,रस्ता नसल्याने ग्रामस्थांना वाघीरा साठवण तलावाच्या भिंतिंवरून जावे लागते,सांडव्यात पाणी असल्यामुळे गुडघाभर पाण्यातून जावे लागते.

सखाराम रांजवण , मेंगडेवाडी ग्रामस्थ आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की ,”रस्त्याची फार अडचण आहे, पावसाळ्यात लेकरा बाळांसाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागते, दूध, भाजीपाला, सगळं याच सांडव्याच्या पाण्यातुन न्यावं लागतं,रस्ता व्हायला पाहिजे.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईत जाऊन निवेदन दिले – प्रशांत कदम

मेंगडेवाडी ग्रामस्थांनी ७३ वर्षा पासुन रसत्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले आहेत, साहेबराव दरेकर,मा. पंकजाताईं मुंढे, आ.सुरेश आण्णा धस. आ.बाळासाहेब आजबे यांना निवेदन देण्यात आली आहेत, शेवटी मुंबई येथे जाऊन १७ फेब्रुवारी २०२० सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना लेखी निवेदन दिले, सगळेच तोंडावर गोड बोलतात, रस्ता मंजूर करून देऊ म्हणतात,पण नंतर दुर्लक्ष करतात.आता आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

मेंगडेवाडी रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सूटत नाही ,लोकप्रतिनिधींनी नुसते आश्वासन न देता लेखी पत्र संबंधित कार्यालयास द्यावे जेणेकरून रस्त्याचा सर्व्हे होईल व रस्ता कामास तात्काळ सुरुवात होईल

– प्रताप विघ्ने ,दशरथ नगर ,वाघिरा मेंगडेवाडी रोड ,वाघिरा

साप चावलेला पेशंट उचलुन न्यावा लागला सुदैवाने वाचला – हनुमान शिंदे

शासकीय रस्ता झालाच नाही, नाईलाजाने वाघिरा साठवण तलावाच्या भिंतीवरून जावं लागतं, पावसाळ्यात घसरून पडण्याच्या घटना ब-याचवेळा घडल्या आहेत. साप चावलेला पेशंट रस्ता नसल्यामुळे दवाखान्यात न्यायला ऊशीर झाला.तब्येत जास्तच बिघडली. सुदैवाने मरतामरता वाचला.

शाळकरी मुलांची पावसाळ्यात गैरहजेरी लागते –शिंदे विकास

मेंगडेवाडी येथिल ४ च्या पुढील मुलांना शिक्षणासाठी,वाघिरा,लिंबागणेश याठीकाणी जावे लागते, पावसाळ्यात सांडव्यावाटे पाणी आल्यानंतर शाळेला सुट्टी देण्यात येते.मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे.

रास्ता रोको आंदोलनाचा इशारा–डॉ गणेश ढवळे

सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा काहीच हालचाल न केल्यामुळे अखेर मेंगडेवाडी ग्रांमस्थांनी दि. १० आगस्ट २०२० रोजी वाघिरा फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी यांठीकाणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी, तहसिलदार पाटोदा यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना दिला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.