सोयगाव,दि.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव सह तालुक्यात पारंपरिक उत्सव आणी एकत्रित कुटुंबाची किनार लाभलेल्या कानबाई(रोट)चे रविवारी उत्साहात आगमन झाले आज त्यामुळे आज आणि सोमवारी दोन दिवस एकत्रित कुटुंबाच्या जेवणावळीची चंगळ उडणार आहे.
पुरणपोळी खीर आणि केळीच्या पानावर जेवणावळी असा बेत या कानबाई उत्सवात असतो श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी हा कानबाईचा उत्सव येतो याला रोट असेही म्हणतात सोमवारी दुपारी या कानबाईचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येईल
छायाचित्र ओळ सोयगाव तालुक्यात घराघरात विस्थापित झालेल्या कान बाई.