अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―कोणतीही मोहीम,अभियान यशस्वी करायचे असेल तर गरज असते ती योग्य नियोजनाची आणि नियोजनानुसार अंमलबजावणीची त्यानुसार अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी ग्रामपंचायतीने 4 हजार वृक्षरोपांची लागवड कोणत्या ही शासकीय निधी वा मदतीविना स्वखर्चाने वृक्षसंगोपन करून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेबाबत झाल्याचे दिसून येते.कमी उंचीच्या रोपांचा पुरवठा,संगोपनासाठी स्वतंत्र निधीचा अभाव असल्याने वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे.परिणामी,
लोकसहभागाच्या भरवशावर सोडलेली ही मोहीम खड्ड्यात गेल्याचेच दिसून येत आहे.पण,याला अपवाद ठरले आहे ते अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी हे गांव.जुलै-2019 मध्ये गायरान जमिनीवर लिंब(1150),करंज(1630),शिसव(450), आवळा(410), सिताफळ(200),चिंच(70), रामफळ(50),वड(20),पिंपळ(20) अशी एकूण तब्बल 4 हजार वृक्षरोपांची लागवड केली.यासाठी अंबाजोगाई येथील वनविभागाचे अधिकारी वरूडे,नागरगोजे तसेच परळी येथील गित्ते,सामाजिक वनीकरणचे मोहीते यांनी झाडे उपलब्ध करून दिली.तर यातील 56 चिंच वृक्षरोपे ही रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई यांनी भेट दिली आहेत.आज ही सर्व झाडे एक वर्ष वयाची आणि 5 ते 6 फुट उंचीची झाली आहेत.वृक्ष जगविण्यासाठी पाणी,खड्डा काढणे,लागवड,आळे करणे,खुरपणी,खत देणे,पाण्याची मोटार,पाईपलाईन,वीज बील,मजुराचा पगार,वाहतुक,वृक्षसंगोपन आदी बाबींवर जवळपास 6 ते 7 लाख रूपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.हा सर्व खर्च भतानवाडी ग्रामपंचायतीने स्वखर्चातून केला आहे.यापूर्वी सन 2016 पासून पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सक्रिय सहभाग आणि यावर्षी समृध्द गांव स्पर्धेत पाञ असलेल्या 28 गावांमध्ये समावेश झाला आहे.कोरोना (कोवीड-19) मुळे ही
स्पर्धा पुर्ण होवु शकली नाही.तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत भतानवाडीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.यासाठी भतानवाडी ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक विठ्ठलराव भताने,सरपंच सौ.रूख्मिणीताई भताने,सोनाबाई रामराव भताने आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव भताने यांचेसह गावक-यांचे ही मोठे योगदान लाभले आहे.अशा उपक्रमाला
1) वृक्ष लागवड व संगोपन आणि 2) संगोपन या योजनांमधून पंचायत समितीने जिल्हा परिषद,सामाजिक वनीकरण आणि कृषी विभाग यांचेकडे पाठपुरावा करून तात्काळ निधी मंजूर करून दिला पाहिजे.यासाठी गटविकास अधिकारी घोणशीकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे.बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार,गिरी साहेब यांनी भेट दिली पाहिजे.तर अंबाजोगाई तालुक्यातील भतानवाडी सारख्या अनेक ग्रामपंचायती वृक्षरोपांची लागवड व संवर्धन करण्यासाठी पुढे येतील.पर्यावरण संवर्धनाचे काम करणारांना प्रोत्साहीत केले पाहिजे.सृष्टीवर खरेच हिरवाई आणायची असेल तर वृक्ष लागवड मोहिमेत सुधारणा करण्याची गरज आहे.गेल्या काही दशकांमध्ये तापमान वाढ झाली आहे.त्याला वृक्षतोड मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे.पर्यावरणाचा
समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण अनिवार्य आहे.अंबाजोगाई तालुक्यात वृक्ष रोपांची लागवड,संगोपन व संवर्धनासाठी पुढाकार घेणा-या व उत्तम काम करणा-या ग्रामपंचायतींना जिल्हा परीषद व पंचायत समिती यांनी प्रोत्साहीत करण्यासाठी वॉटरकपच्या धर्तीवर
रोख रकमेचे बक्षीस देणारी स्पर्धा सुरू करावी.50 टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जगविणा-या ग्रामपंचायतींना बक्षीसपाञ समजावे.
तसेच रोपवाटिकांनाही भरीव निधी उपलब्ध करून द्यावा.यातून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या पर्यावरण संवर्धन करण्यासाठी नक्की पुढे येतील.
वृक्ष लागवडीनंतर हवे संगोपनासाठी सहकार्य
वृक्षलागवड मोहिमेसाठी रोपे तयार करणे,ही रोपे रोपवाटिकेतून आणण्यासाठी वाहतूक,झाडे लावण्यासाठी खड्डे काढणे आदी बाबींवर खर्च केला जातो.मग या खर्चातून फलनिष्पत्ती काय.? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.कारण,वृक्ष लागवडीसाठी दोन वर्षांची आणि चार ते पाच फूट उंचीची रोपे पुरविली तर जगण्याचे प्रमाण वाढेल.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वृक्ष लागवडीनंतर संवर्धन व संगोपनाची जबाबदारी निश्चित करून त्यावर नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. – ज्ञानदेव भताने (सामाजिक कार्यकर्ते)
शासनाने ग्रामपंचायतींना वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र निधी द्यावा
शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी मोठे उद्दिष्ट दिले जाते.त्यामुळे वृक्ष लागवडीत गुणवत्ता राहत नाही.शासनाने संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व देणे गरजेचे आहे.ग्रामनिधीतून
ग्रामपंचायतींचा कारभार चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.त्याच निधीतून पुन्हा वृक्ष संवर्धनाच्या कामाची अपेक्षा केली जात आहे.त्याऐवजी शासनाने ग्रामपंचायतींना
वृक्ष संवर्धन व संगोपनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा. ―सौ.रूख्मिणीताई विठ्ठल भताने (सरपंच,भतानवाडी)