सोयगाव, दि.२७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
एका पाठोपाठ एक घरातील विजेच्या उपकरणांचा स्फोट होत स्फोटांची मालिका सुरू झाल्याने घोसला गावातील ग्रामस्थ हादरले होते परंतु प्रत्येकाच्या घरातील वीज उपकरणे मात्र या स्फोटात जळून खाक झाली होती या घटनेमुळे मात्र गावात घबराट उडाली होती
घोसला ता सोयगाव गावात अचानक गाव पुरवठ्याच्या रोहित्रात मोठा तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे घराघरातील वीज उपकरणांचा शॉर्ट सर्किट होऊन गावातील घरात मोठे स्फोट झाले या स्फोटांनी मात्र ग्रामस्थ भेदरलेल्या अवस्थेत घराबाहेर पडल्याने गोंधळ उडाला या घटनेत दूरदर्शन संच,पंखे,ट्यूब,मोबाईल,आदी वस्तू जळून खाक झाल्या आहे
पेटत्या ट्युबच्या काचा–
घरात पेटत्या असलेल्या ट्युबच्या चक्क काचा काचा होऊन मोठे आवाज झाले होते,सुरू असलेल्या पंखे स्फोटात तुटून छताच्या बाहेर झाले होते असे प्रत्यक्षदर्शी ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले या स्फोटांच्या मालिकांनी ग्रामस्थ हादरले होते मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून काही सतर्क ग्रामस्थांनी तातडीने गाव वीज पुरवठ्याचे रोहित्राचा वीज पुरवठा बंद केल्याने पुढील अनर्थ टळला
लाखो रुपयांचे नुकसान –
घोसला गावात झालेल्या या घटनेत लाखो रु चे नुकसान झाले असून अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहे
महावितरणच्या पथक घटनास्थळी नाही–-
महावितरणच्या पथक अद्याप घटनास्थळी दाखल झाले नसून हा प्रकार अचानक वाढता विजेच्या दाबाने झाला असावा असा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे