बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजशेतीविषयकसामाजिक

मुलाच्या शिक्षणाच्या विवंचनेत शेतकरी भागवत काळकुटे यांची गळफास लावून आत्महत्या ; जमिन विक्रीस काढली परंतु ग्राहक मिळाले नाही

बीड दि.२७:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे ससेवाडी येथिल सध्या स्थाईक शिवाजीनगर ,उदंडवडगांव येथिल ४५ वर्षीय शेतकरी भागवत ऊर्फ बंडु पांडुरंग काळकुटे या शेतक-यांचे सायंकाळी ४ वाजता त्यांच्या मांजरसुंभा येथिल न्यू कन्हैय्या हाटेलच्या मागे स्वत:च्या शेतामध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

सहा महिन्यांपूर्वी कर्ज काढून मुलीचे लग्न केले होते

सहा महिन्यांपूर्वी आरती नावाच्या मुलीचे लग्न केलें होतें त्यासाठी धनरत्न महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बीड चे ५०,००० रू चे कर्ज काढलेले होते.

मुलाच्या शिक्षणासाठी जमिन विक्रीला काढली होती, परंतु ग्राहक मिळत नव्हते

त्यांचा मूलगा तुकाराम या वर्षी १२ वी मध्ये बीडमध्ये शिकत असून फिससाठी व ईतर मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठी जमिन विक्रीस काढली होती परंतु लाकडाऊनमुळे ग्राहक मिळत नव्हते, याच विवंचनेत असायचे असे त्यांची पत्नी वैशाली हिने सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा तुकाराम, मूलगी आरती व दोन भाऊ आणि आई वडील आहेत. पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेकनुर शासकीय दवाखान्यात ठेवला असुन पुढील तपास लक्ष्मण केंद्रे स.पो.नि. नेकनुर पोलिस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.