अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार,दिनांक 27 जुलै रोजी अंबाजोगाईत विनोद पोखरकर यांनी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले होते.
कोरोना संकटकाळात आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये.तसेच हार तु-यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी.नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे,उपक्रम आयोजित करावीत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्याच्या जनतेस केले होते.27 जुलै रोजी आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक,भित्तीपत्रके लाऊ नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले होते.त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक तथा उद्योजक विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाईत 27 जुलै रोजी आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले होते.यात स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील रक्तपेढी व रूग्णालय परिसरात कोरोना प्रादुर्भाव होवु नये म्हणून औषध फवारणी (सॅनिटायझेशन)केली.अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कोरोना योद्धे पोलिस बांधवांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणा-या “आर्सेनिक अल्बम” या होमिओपॅथीक औषधी गोळ्या व सॅनिटायझर,स्प्रे आदींचे वाटप करण्यात आले.यावेळी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे हे उपस्थित होते.यासोबतच अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्वच्छता आणि विद्युत विभागातील कंञाटी कर्मचारी यांना मास्क(एन-95) वाटप करण्यात आले.तसेच ग्रामदेवता माता योगेश्वरी देवी मंदिर प्रवेशद्वारासमोर राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक अशोकराव गाढवे,गणेश जाधव,अर्जुन जाधव,आयोजक विनोद पोखरकर,डाॅ.विकास सत्वधर,पंकज परदेशी,कल्याण गायके हे उपस्थित होते.विनोद पोखरकर हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ते ज्येष्ठ नेते माजी मंञी जयदत्तआण्णा क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्वञ ओळखले जातात.दिवंगत शिवसैनिक वसंतआप्पा पोखरकर यांचा वारसा जोपासत लॉकडाऊन काळामध्ये विनोद यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली.गरजूंना मोफत जेवण, अन्नधान्याचे कीट, मास्क, सॅनिटायझर वाटप,सॅनिटायझेशन फवारणी ही केली.तसेच लॉकडाऊन काळात हिंगोली जिल्ह्यातील मजुर हे अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या सिमेवर जंगलात अडकून पडले होते त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले.फेसबुकद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून सुरक्षित कसे राहता येईल हे सांगितले.आज सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र यायला हवे.अंबाजोगाई नगरपरिषद परिसरामध्ये दररोज शेकडो लोक ये-जा करतात.तसेच कर्मचारी यांच्यासाठी 2 सॅनिटायझर मशीन सुरू करून यामुळे रोज शेकडो लोकांचा फायदा होवून ते सुरक्षित राहतील हा विचार हॉटेल साई सुरभीच्या माध्यमातून पुढे आणला आहे.