सोयगाव दि.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यातील बनोटी आणि गोंदेगाव येथे बुधवारी (ता.२९) घेण्यात आलेल्या १७३ अॅटीजन टेस्ट पैकी बनोटी येथे सहा तर गोंदेगाव सहा असे बारा जणांचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती आरोग्य अधिकारी कृष्णा घावटे यांनीं दिली.यात बनोटी येथील एक महीला पदाधिकारी असुन गोंदेगाव येथे भाजपा पदाधिकारी आहे. दोन्ही गावे मिळुन एकूण चोवीस रुग्ण झालेले आहेत.
शहरी भागात सिमीत राहीलेल्या कोरोना व्हायरसने महिनाभरापासून ग्रामीण भागात पाय पसरविण्यात सुरुवात केली असून जिल्हाच्या सिमावर्ती भागातील सोयगाव तालुक्यात बनोटी आणि गोंदेगाव हाॅटस्पाट ठरली आहे मंगळवारी बनोटी येथील दोन तर गोंदेगाव येथील दोन अशा चार जणांच्या संपर्कातील तसेच लक्षणे दिसत असलेल्या एकशे त्रेहात्तर जणांची अंटीजन टेस्ट घेण्यात आल्या यात गोदेंगाव येथे एका पुरुष पदाधिकाऱ्यासह सहा जण तर बनोटी येथे एका महीला पदाधिकाऱ्यांसह सहा जण कोरोना बाधित मिळुन आल्याने बाराही जणांना जरंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड सेंटर येथे भरती करण्यात आले .
बनोटी व गोंदेगाव येथील वाढत्या रुग्णाची संख्या पहाता तहसिलदार प्रविण पांडे, तालुका आरोग्य अधिकारी कृष्णा घावटे, सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, गट विकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी रुग्ण आढळून आलेल्या परिसराची पहाणी करीत चार ठिकाणचा परिसर शिल केलेला आहे. उपसरपंच सागर खैरनार, सरपंच पुष्पाबाई नेरपगार, उपसरपंच आबा बोरसे यांनी गावातील सिमा बंद करीत नागरिकांना घाबरून जाऊ नये कोणाला कोरोना सदृश लक्षणे दिसत असल्यास कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
बनोटी ग्रामपंचायतीकडुन रुग्ण आढळून आलेला परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.