जळगाव:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर त्यांनी आज जिल्ह्यातील शिक्षकांच्या भावना कोरोना संसर्ग च्या वाढत्या प्रादुर्भावाने लक्षात घेऊन शिक्षक संघटना मित्रपरिवारासह जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार सौ रंजना पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती भाऊसो रवींद्र पाटील, त्या जोडीने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर अभिजित राऊत,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील साहेब जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे साहेब आदि सर्वांना आज माध्यमातून आलेल्या बातमीच्या माध्यमातून दैनिक लोकमतचे व इतर माध्यमातून आलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर व जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्याआणि शिक्षक बांधव व्हाट्सअप वरील सर्व ग्रुपच्या माध्यमातून आलेल्या विनंतीनुसार प्रत्यक्ष भेटी नुसार सर्व संबंधितांच्या वरिष्ठांच्या दालनात आज सोशल डिस्टन्स सर्व नियम पाळून प्रत्यक्ष भेटून जळगाव येथे संवाद निवेदन दिले . सर्व मान्यवरांना त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली covid-19 कोरोना पार्श्वभूमीवर शिक्षकांचे आलेले मेसेज भा वना यानुसार सर्वांच्या अपेक्षेनुसार पुढाकार घेत सर्व शिक्षक संघटनांच्या मदतीने निवेदन दिले बदल्यात तूर्तास थांबवण्याचे व विनंती नुसारच करण्याच्या संदर्भात आग्रही भूमिका घेत साकडे घातले.ते निवेदन या ठिकाणी सादर करण्यात येत आहे गरजू व विस्थापित रॅण्डम राऊंड मधील शिक्षक बंधू भगिनींच्या त्यांच्या विनंतीनुसार रिक्त जागेवर बदल्या संबंधित शिक्षकांच्या विनंतीनुसार फक्त विनंती नेच करावी म्हणजे संख्या कमी राहील अशी यावेळी मागणी करण्यात आली. या वेळी संबंधित सर्वांनी सविस्तर म्हणणे ऐकून घेऊन विचारविनिमय करण्याचे सूतोवाच केले. यावेळी उपस्थितांचे निवेदनावर स्वाक्षरी असून सदरील जसेच्या तसे निवेदन याठिकाणी देत आहोत. आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांनी देखील त्यांचा अनमोल वेळ देऊन शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य महासचिव किशोर पाटील कुं झरकर व शिक्षक संघटनांच्या सहभागी सर्वशिष्टमंडळाने त्यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास यादवराव नेरकर, शिक्षक समितीचे राजेश रामराव पवार,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ ब्रिजलाल पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा पदाधिकारी राकेश पाटील विश्वासराव राजाराम सूर्यवंशी ुनील हिम्मतराव पाटील नितीन रमेश पाटील मनोज चिंतामण ठाकरे मनोज प्रकाश पाटील ईश्वर पाटील पंकज रमेश्राव गरुड संदीप निळकंठ पाटील पद्माकर पाटील मुकेश मुरलीधर पाटील सतीश नारायण मराठे रवींद्र गंगाराम बोरसे पंकज अशोक चव्हाण जगन्नाथ किसन नरेंद्र सुभाष पाटील विश्वेश अशोकराव चव्हाण ज्ञानेश्वर नथू पाटील दिलीप सुकलाल बावीस्कर श्री एम एस पाटील ,यांचेसह सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या राज्य समन्वय समितीच्या लेटरहेडवर निवेदनावर स्वाक्षऱ्या असून सर्वांनी मिळून समन्वयाने निवेदन दिले सदरील निवेदनाच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या भावनाजळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील यांनी जाणून घेतले यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नामदार सौ रंजना ताई पाटील त्याच जोडीने जिल्हा परिषदेचे आदरणीय नंदकुमार महाजन त्या जोडीने जिल्हा परिषद चे सन्माननीय सदस्य नाना भाऊ महाजन, आर जी नाना पाटील आदींची उपस्थिती होती त्या सर्वांनी शिक्षकांच्या संदर्भाच्या सर्व भावना ऐकून घेतल्या या ठिकाणी मांडण्यात आले असून जर गरज असेल आणि बदल्या करायच्या असतील तर विनंती बदली प्रक्रियेलागरजेनुसार विस्थापित महिला शिक्षक बंधू-भगिनी च्या सोयीच्या ठिकाणी विनंती ने ऑनलाइन पद्धतीने बदल्यांनाहरकत नसल्याचे म्हटले आहे.सदरील निवेदनाच्या संदर्भात सातत्याने व काही शिक्षक बंधू-भगिनींनी प्रत्यक्ष येऊन भेट घेऊन साकडे घातल्याने पुढाकार घेत निवेदन दिल्याचे यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य महासचिव तसेच राज्यातील शिक्षक संघटनांचा राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून जिल्ह्यातील शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन सर्वांनी सुरक्षिततेसाठी मास्क तोंडाला लावून चेहऱ्यावर लावून सर्व मान्यवरांशी चर्चा केली असून जिल्ह्यातील हजारो शिक्षकांच्या भावना सर्व वरिष्ठांपर्यंत पोच केल्या आहेत यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाचा निर्णय अंतिम असून जिल्हाधिकारी साहेब जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील साहेब जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय नामदार सौ रंजनाताई पाटील जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षण सभापती आदरणीय रवींद्र भाऊ पाटील जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन जिल्हा परिषदेचे गटनेते शशिकांत भाऊ साळुंखे त्या जोडीने सन्माननीय जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष दादा पाटील, खासदार रक्षाताई खडसे सर्वांना भावना कळविण्यात आले आहेत. यासंदर्भात एक संघटना समन्वय राज्य समन्वय समिती या नात्याने शिक्षकांच्या प्रत्यक्ष आपल्यापर्यंत आलेल्या भावना, फोन व प्रत्यक्ष भेटून त्यांनी मांडलेले प्रश्न पोचविणे संबंधित सर्वपर्यंत गरजेचे असल्याने आज हे पाऊल उचलण्यात आले आहे असे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.