लिंबागणेश दि.३०:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांनी जीव धोक्यात घालून करत असलेली समर्पित सेवा पाहता, वैद्यकीय अधिकारी यांना काही उपकरणं मिळतात.परंतु ग्रामिण भागातील पोलिस चौकी कर्मचा-यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणं मिळणं गरजेचं आहे. याच भुमिकेतुन मातोश्री कुसुम श्रीधरराव ढवळे यांच ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. दशक्रिया विधीच्या खर्चाला कात्री लावून नेकनुर पोलिस ठाणे स.पो.नि. लक्ष्मण केंद्रे यांच्या हस्ते लिंबागणेश पोलिस चौकीतील जमादार जी.बी.वाघमारे , सुरेश पारधी , सोनावणे यांना भेट स्वरूपात देण्यात आले.
शहीद नरेंद्र दाभोलकर यांचा प्रभाव आणि प्रा. हनुमंत भोसले यांचा विद्यार्थी म्हणुन कृतिशील उपक्रम
केज तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले यांचा विद्यार्थी असल्याकारणाने आणि पुण्यामध्ये शहीद नरेंद्र दाभोलकर यांचा सहवास लाभला व त्यांचा प्रभाव असल्या कारणू कारणाने कर्मकांड टाळून आईच्या दशक्रिया विधीच्या खर्चाला कात्री लावून लिंबागणेश येथिल पोलिस चौकीतील कर्मचारी यांना ईन्फ्रारेड थर्मामिटर व फिंगर टीप आक्सिमिटर भेट स्वरुपात दिले.
पोलिस चौकीतील कर्मचारी यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ जिल्हाधिकारी यांनी मिळवून द्यावा
वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनाच्या लढाईत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपकरणे उपलब्ध आहेत. त्याचवेळी ग्रामिण भागातील प्रत्येक पोलिस चौकी मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण उपकरणे द्यावीत अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.