कै.वसंतअप्पा पोखरकर यांनी आजी-माजी सैनिकांना दिले भक्कम पाठबळ― कॅ.पांडुरंग शेप

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―अडचणीत असलेल्या सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणा-या कै.वसंतअप्पा पोखरकर यांनी आजी-माजी सैनिकांना ही भक्कम पाठबळ दिले असल्याचे प्रतिपादन जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप यांनी व्यक्त केले.

येथील माजी सैनिक कै.वसंतअप्पा पोखरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार,दिनांक 23 जुलै रोजी “कै.वसंतअप्पा पोखरकर आजी-माजी सैनिक वसाहत” या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप बोलत होते.शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रांत वसंतअप्पा पोखरकर यांची ओळख एक निष्ठावंत शिवसैनिक अशी होती.मराठवाड्याच्या पहिल्या पिढीतील शिवसैनिक म्हणून ते
राज्यभर ओळखले जात.अंबाजोगाई शहर व तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करण्यात वसंतअप्पा यांचे मोठे योगदान आहे.माजी सैनिक असल्याने त्यांनी आजी-माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला.दोन वर्षांपूर्वी आप्पांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त अंबाजोगाईतील कै.वसंतअप्पा पोखरकर आजी-माजी सैनिक वसाहत या ठिकाणी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणा-या वृक्षांची निवड करून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप,उपाध्यक्षा श्रीमती महानंदा पोखरकर,सचिव कॅ.अभिमन्यू शिंदे,बाबासाहेब केंदे,सय्यद खाजा नजिमोद्दीन,चंद्रकांत विरगट,अच्युत लाखे,कुंडलिक गव्हाणे,महादेव कांदे,माणिक काचगुंडे,ज्ञानेश्वर कदम,शेख उस्मान शेख हुसेन,सुभाष सातभाई,मंगेश केंद्रे,सुभाष निकम,भास्कर कसबे,श्रीमती सिंधु नरहारी निर्मळ,योगेश पोखरकर यांचेसह इतरांची उपस्थिती होती.आज कै.वसंतअप्पा पोखरकर यांचा वारसा जोपासण्याचे काम त्यांचे सुपुत्र योगेश पोखरकर हे करीत आहेत.राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहरराव जोशी जेव्हा-जेव्हा अंबाजोगाईत आले तेव्हा-तेव्हा त्यांनी आवर्जून वसंतअप्पांच्या घरी भेट दिली.वसंतअप्पा हे शिवसेनेचे ढाण्या वाघ आहेत अशी प्रशंसाही त्यावेळी जोशी यांनी केली होती.मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरात सर्वप्रथम शिवसेनेची शाखा स्थापन करून अंबाजोगाई तालुक्यात शिवसेनेचा
विस्तार करण्याचे मोलाचे कार्य त्याकाळी वसंतअप्पा पोखरकर यांनी केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.