अंबाजोगाई: दहावीच्या निकालात नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचे यश ; 177 विद्यार्थी उत्तीर्ण,संस्थेचा 97% निकाल

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील श्री.त्रिंबकेश्‍वर शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवित यावर्षी ही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.या विद्यालयाचे 183 विद्यार्थ्यांनी मार्च-2020 मध्ये दहावीची परिक्षा दिली.पैकी 177 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेच्या निकालाची टक्केवारी 96.72 टक्के इतकी आहे.मागील 12 वर्षांपासून शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयाचा मार्च-2015 चा शंभर टक्के एवढा होता.या वर्षी ही दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे.शाळेचे 65 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह,74 विद्यार्थी प्रथम श्रेणीत,31विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 7 विद्यार्थी हे तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी मोहन मधुकर पवार (94.80 टक्के), ज्ञानेश्वर दत्तात्रय तोडकर (93.80 टक्के),संदीप प्रभू मुंडे (93.60 टक्के),प्रतीक अशोक यादव (93.40 टक्के),तेजसकुमार तुकाराम सोनवणे (93.40 टक्के),सुनील शिवाजी चव्हाण (92.40 टक्के),रितेश हरिदास सोळंके (92.20 टक्के),नामदेव श्रीराम बडे (91.40 टक्के),कु.आकांक्षा दिगंबर यादव (90.40 टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.हे विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.प्रतापसिंह शिंदे,मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.