सोयगाव,दि.३०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― तब्बल पाच महिन्यापासून कोरोना संसर्गाला एकाकी झुंज देणाऱ्या जरंडी ता सोयगाव ला एकाच दिवसात गुरुवारी अँटीजन तपासणीत सहा रुग्ण आढळून आल्याने एकाकी झुंजीत जरंडी अपयशी ठरले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही पालन न करण्यात आल्याने जरंडी गावावर आता कोरोना शी झुंज द्यावी लागली आहे.
जरंडी येथील एका तरुणाला ताप,सर्दीचे लक्षणे आढळून आल्याने त्याला जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्याचा संशयित रुग्ण म्हणून डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी अँटीजन तपासणी केली त्याचा अहवाल सकारात्मक आला होता त्यावरून तातडीने गावात या तरुणाची संपर्क मोहीम राबवून त्यातील 25 जणांची अँटीजन तपासण्या केल्या आज त्यात 4 महिला 1 पुरुष असे एकूण 6 जण जरंडी ला सकारात्मक आढळले
––-–-––-
ग्रामपंचायत कडून परिसर सील-
जरंडी ग्रामपंचायत कडून सकारात्मक रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला असून 70 जणांना होम कोरिन्टीन करण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यात तीन दिवसांपासून अँटीजन तपासण्याचा धडका सुरू असल्याने अँटीजन किट संपल्याने तपासण्या बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे अँटीजन चा पुरवठा होताच पुन्हा जरंडीला तपासण्या घेण्यात येईल.
सोयगाव चे तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,ग्रामसेवक सुनील मंगरूळे,तलाठी दीपाली जाधव,आदी घटनास्थळी हजर होऊन त्यांनी ग्रामस्थांना वेळोवली सुचना दिल्या डॉ श्रीनिवास सोनवणे,डॉ सौ विद्या पवार,हर्षल विसपुते आदींच्या पथकाने अँटीजन तपासण्या केल्या.
जरंडीच्या कोविड केंद्रात दोन दिवसात तब्बल 24 रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले असून रिक्त पदे असलेल्या कोविड केंद्रात मात्र आता गैरसोयीचे बाजार होणार आहे.