अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― शेषेराव भाऊ गंगणे यांनी आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले.ते सतत आमच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहेत.दैठणा (राडी) गावाच्या सर्वांगीण विकासात शेषेराव भाऊ यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्ताञय पाटील यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा (राडी) या गावात ज्येष्ठ नेते शेषेराव नारायणराव गंगणे यांच्या 73 व्या अभिष्टचिंतन प्रसंगी कोरोना प्रादुर्भाव होवु नये म्हणून सॅनिटायझर,मास्क वाटप व वृक्षारोपण आदी उपक्रमांचे आयोजन बुधवार,दिनांक 29 जुलै रोजी करण्यात आले होते.शेषेराव नारायणराव गंगणे हे अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा (राडी) गावचे पंधरा वर्षे सरपंच होते.25 ते 30 वर्षे ते दैठणा (राडी) सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन होते.तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे ते 10 वर्षे संचालक होते.अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना उभारणीपासून गंगणे भाऊ हे त्यावेळचे बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील जाणकार दिवंगत नेते डी.एन.पाटील यांच्यासोबत निष्ठेने राहिले.दैठणा (राडी) गावातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम त्यांनी केले.शेषेराव गंगणे यांनी त्यांचे चार भाऊ,तीन बहिणी यांचे संगोपन करून कुटुंबाला सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून दिले.त्यामुळेच आज गंगणे परिवारातील अनेक तरूण हे उद्योग आणि व्यवसायात स्थिरावलेले दिसतात.शेषेराव गंगणे यांचे पुतणे राजकुमार गंगणे हे सध्या अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.पुर्वी गंगणे कुटुंबात बारा एकर जमीन होती.शेषेराव भाऊ व कुटुंबियांनी कष्ट करून बारा एकरपासून 125 एकर जमीन वाढविण्याचे काम केले.दैठणा (राडी) गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत करणे,सेवा सहकारी सोसायटी तयार करणे,गावात वीज आणणे आणि वंचित कुटुंबातील गरजूंना घरकुल मिळवून देण्याचे कार्य शेषेराव गंगणे यांनी केले शेषेराव गंगणे यांना तीन मुले व एक मुलगी आहे.संजय,धनंजय आणि विजयकुमार हे तीन मुले तर सौ.सुनिता सुहास सोळंके या कन्या आहेत.शेषेराव गंगणे यांच्या वयाला 73 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गंगणे परिवाराच्या वतीने दैठणा (राडी) ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी ताई व सेविका,तंटामुक्ती समिती,आशा सेविका,किराणा दुकानदार,ऑटो मालक व चालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना सॅनिटायझर,मास्क वाटप करण्यात आले.तसेच सामाजिक सलोखा जोपासत मान्यवरांच्या उपस्थितीत मस्जिद व समाज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील,प्रा.प्रशांत जगताप,रणजित लोमटे,राजकुमार गंगणे,वृक्षमित्र सुधाकर देशमुख,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे,विजयकुमार गंगणे,सतिश भांडे या मान्यवरांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रा.प्रशांत जगताप व रणजीत लोमटे यांनी भाऊंना दीर्घायुष्य लाभावे अशा सदिच्छा दिल्या तर वृक्षमिञ सुधाकर देशमुख यांनी आपणांस भाऊंचे सतत सहकार्य व मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले.अभिष्टचिंतनासाठी जमलेल्या स्नेही जणांना शेषेराव गंगणे यांनी धन्यवाद दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युतराव गंगणे यांनी करून उपस्थितांचे आभार आर.डी.जोगदंड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दैठणा राडी गावातील युवक तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.