औरंगाबाद दि.३१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोरोनाचा रौद्र रुप पहावयास मिळाले आठ वर्षीय बालकासह पच्चावन्न वर्षीय पुरुषासह एकुण चाळीस जण शुक्रवारी (३१)बनोटी व देव्हारी या दोन गावात घेण्यात आलेल्या 125 अॅंटीजन चाचणीत अहवाल सकारात्मक आल्याने तालुका प्रशासन गोंधळून गेले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात जास्त रुग्ण सोयगाव तालुक्यात मिळाल्याने पर्यायी कोविड सेंटर ऊभारण्याची वेळ तालुका प्रशासनावर येवुन ठेपली तालुक्यासाठी जरंडी येथे पन्नास रुग्णाकरीता बनविलेल्या एकमेव कोविड सेंटर मध्ये रुग्णाची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने पर्यायी कोविड सेंटर ऊभारण्यासाठी तालुका प्रशासन कामाला लागले आहे. बनोटी येथे एकूण पन्नास अॅंटीजन चाचण्या घेण्यात आल्या यात दोन बालकासह आठ पुरुष आणि आठ महीला कोरोना संक्रमित मिळाले असून सर्व रुग्णांना जरंडी येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देव्हारी ता,सोयगाव येथे 75 अँटीजन तापसण्यामध्ये तब्बल 21 रुग्ण सकारात्मक आढळले आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,आदी देव्हारी ता सोयगवला तळ ठोकून होते जुलैच्या तिसर्या आठवड्यात एकही रुग्ण नसलेल्या बनोटी येथे एकाच आठवड्यात सत्तावीस रुग्ण आढळून आलेले आहेत संपुर्ण गावच कंटेन्टमेन्ट झोन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे देव्हारी ता सोयगाव येथेही तीच स्थिती असतांना दोन दिवसात 25 रुग्णांची भर देव्हारी गावात पडली असून जरंडीला शुक्रवारी एकमेव रुग्ण आढळला आहे त्यामुळे चारच दिवसात सोयगाव तालुक्यात 75 रुग्ण संख्या पार करण्यात आली आहे तालुक्यात एकमेव मुख्य बाजारपेठ असलेल्या बनोटी येथे एकामागोमाग एक रुग्ण आढळून आल्याने परिसरातील पंचवीस गावांतील ग्रामस्थांची झोप उडाली असून बनोटी येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
देव्हारी ता सोयगाव येथील रुग्णांना अजिंठा कोविड केंद्रात दाखल
देव्हारी ता सोयगाव येथील 21 नवीन रुग्णांना अजिंठा ता सिल्लोड येथील कोविड केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत रुग्णांना आजिंठ्या ला घेबून जाण्यात येत होते