सोयगाव, दि.१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात चार दिवसांपासून अचानक कोरोना संसर्गाने विळखा घातला असून शनिवारी दि 1 देव्हारी ता सोयगाव येथे घेण्यात आलेल्या अँटीजन तपासण्या मध्ये 18 नवीन रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे आता प्रशासनाला रुग्ण ठेवण्याची चिंता लागून आहे.
सोयगाव तालुक्यात चार दिवसात बनोटी,गोंदेगाव , जरंडी,वरठाण,उपलखेडा, देव्हारी आणि जामठी या सात गावांमध्ये अचानक कोरोना विषाणू सक्रिय झाल्याचे रुग्णसंख्येवरून निष्पन्न झाले आहे त्यामुळे सोयगाव तालुक्याची रुग्णसंख्या 103 वर पोहचली आहे सोयगाव तालुका चारच दिवसापूर्वी दहा रुग्णांना घरी निरोप देऊन कोरोना मुक्तीकडे प्रवास करत असतांना अचानक मात्र संक्रमण वाढल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे जरंडीच्या एकाच कोविड केंद्रावर तालिक्यातील रुग्णांचा लोड वाढला असल्याने या पूर्वीच जरंडी कोविड केंद्र फुल झाले आहे त्यामुळे जवळच असलेल्या निंबायती तालीमुल उर्दू शाळेतील पूर्व तयारी करून ठेवलेल्या या कोबीड केंद्रात रुग्णांची व्यवस्था करण्याची काम प्रशासनाने हाती घेतले होते.
सोयगाव तालुक्यात अचानक वाढत्या संक्रमण संख्येमुळे प्रशासनाकडून गावनिहाय कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून बाधित गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवावे व तसेच संशयित हालचाली कळविण्यात याव्या असे सांगण्यात आले आहे सातही बाधित गावात तातडीने विशेष प्रवेशबंदी झोन तयार करण्यात येऊन 700 जणांना होम कोरोटाईन तर सकारात्मक व्यक्तीच्या शेजारील कुटुंबा ला होम आयसोलाशन करण्यात आल्याची माहिती तालुका अधिकारी -डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी दिले आहे.
सोयगाव तालुक्यात अपेक्षा नसतांना वाढलेली संक्रमणाच्या संख्येच्या पाळेमुळे शोधण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले असून पाच महिन्यापासून सुरक्षित सोयगाव ला शिरकाव झाला कसा याचाही शोध घेण्याची प्रशासनाची मोठी कसरत राहणार आहे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे आदींची पथक तळ ठोकून आहे.