अंबाजोगाई:लोकमान्य टिळक यांचे स्मृती शताब्दी वर्ष आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या दोन्ही महापुरूषांना शनिवार,दिनांक 1 ऑगस्ट रोजी अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला 128 वर्षे झाली आहेत.तरीही हा उत्सव आज त्याच स्वरूपात व उत्साहात सुरू आहे.लोकमान्यांनी पत्रकारिता क्षेत्रात राष्ट्रीय मूल्ये रूजविली निर्भिड व निष्पक्ष पत्रकारिता केली.ते निष्काम कर्मयोगी होते.केसरी (मराठी) आणि मराठा (इंग्रजी) या वृत्तपत्रांची स्थापना केली.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे भरीव योगदान आहे.गणेशोत्सवाच्या माध्यमातून इंग्रजांविरोधात चळवळ उभी केली.आपल्या विचारातून व कृतीतून त्यांनी प्रगल्भ समाजनिर्मितीसाठीचे कार्य केले.1 ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आज त्याला शंभर वर्षे झाली आहेत.त्यांचे विचार पावलोपावली आपल्याला प्रेरणा देतात मार्गदर्शन करतात.तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आग्रगण्य असणारे व्यक्तीमत्व होते,शेतकरी,कामगार कष्टकरी,वंचित,शोषित आणि पिडीत माणसांचे प्रश्न आपल्या लेखणीतून उभे करणारे अण्णा भाऊ यांना साहित्यात “साहित्यसम्राट” म्हणून ओळखले होते.कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार अण्णा भाऊंनी ताकदीने हाताळले,लोकनाट्य,चित्रपट,पोवाडे,लावण्या,वग,गवळण,प्रवास वर्णन आदी साहित्य प्रकार अण्णाभाऊंनी लिहिले,आपल्या गीतांतून व शाहीरी कवनातून अण्णा भाऊंनी सामान्य,कष्टकरी जनतेत प्रबोधन केले. महाराष्ट्रात जनजागृती केली.गावोगाव लोकचळवळ उभी केली.लाल बावटा पथक स्थापन केले. अण्णा भाऊंना अल्प आयुष्य लाभले.21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंब-या अण्णा भाऊंनी लिहिल्या अण्णा भाऊंनी आपले उभे आयुष्य कष्टक-यांचा विचार जोपासत जगले,त्यांच्या पावन स्मृती व त्यांचे कार्य तरूण पिढीने पुढे न्यावे असे आवाहन राजकिशोर मोदी यांनी यावेळी करून तमाम मुस्लिम बांधवांना ईद-उल-अजाह बकरी ईद निमीत्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.येथील सहकार भवन मध्ये लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने यांनी केले.तर सुत्रसंचालन राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण यांनी करून उपस्थितांचे आभार दिनेश घोडके यांनी मानले.या प्रसंगी नगरसेवक मनोज लखेरा,विजय रापतवार,सचिन जाधव आदींसहीत काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.