अंबाजोगाई:साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यात वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरातील यशवंतराव चव्हाण चौका नजीकच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे,नगरपरिषद व्यापारी संकुलात गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांचे हस्ते वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंती उत्सव समिती 100 वृक्षारोपांची लागवड करणार आहे.त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी 31 युवकांनी रक्तदान करून अभियानाचा शुभारंभ केला.जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत 100 जण रक्तदान करणार आहेत.तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.प्रारंभी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अविनाश लोंढे,अविनाश साठे,अॅड.शिरीष कांबळे,धनंजय साठे, जयानंद कांबळे,विनोद वैरागे,किरण भालेकर,सुनील उपाडे,अमोल वाघमारे,अक्षय भुंबे,चंद्रकांत घोडके,गोविंद जोगदंड आदींसहीत इतरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.