अंबाजोगाई: शहरातील सिद्धार्थनगर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा जन्मशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यात आला.कोरोना विषाणू साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून अण्णा भाऊंना अभिवादन करण्यात आले.
सिध्दार्थनगर येथील जेष्ठ नागरिक भानुदासराव सोनकांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका जयश्री ताई साठे,महानंदाताई लोखंडे,कुमार काळे, दिलीप साठे,कचरू साबळे,बबर काळे,बाबाजी साठे, अविनाश साठे,अर्जुन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सचिव अविनाश साठे यांनी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग देऊन प्रोत्साहीत केले.तसेच क्रांतिवीर जनरल कामगार सेना यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तर यावेळी यशराज अलझेंडे,मल्हारी साठे,सचिन खरटमोल,सचिन होके,ऋषिकेश वाघमारे,सुजित साठे, तुषार साठे,नयन गव्हाणे हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धार्थनगर येथील सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला.