बजाजनगर/औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंङळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च २०२०मधील इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेत ञिमूर्ती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .ञिमूर्ती विदयालयातून सर्व प्रथम श्रध्दा उबेदळ , ९२.८०%, धनजंय पाटील ९१.६०%, आरती बिराजदार ९०.२०% , गौरी रेंगे ९०%घेऊन या विद्यार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले आहे .या निमित्ताने संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार(१) रोजी करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भागचंद महाजन, सचिव विजयसिंह ठाकूर, संचालिका अर्चना ठाकूर,
सहसचिव धनंजय नागमवाङ,
राजेद्र अवतारे, मुख्यधयापक नितीन दिक्षीत,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, विजय गव्हाणे, ङि.पी.वाघ आदीची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचे कौतूक करण्यात आले. कौतुक सोहळयांच्या प्रसंगी पालक,विद्यार्थ्यांनी शाळेच्या गुणवत्तेबददल मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरीता दिपक अंधारे,ज्ञानेश्वर दुगांवकर,विशाल पाटिल,
रामेश्वर निकम ,आदीनी परीशम घेतले .कार्यक्रमाचे सुञसंचलन मिंलिद खरात केले .